अखिल पार्क साईट सेवा संघाचे विक्रोळीत महारक्तदान शिबिर संपन्न...
मुंबई - मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालय व सर जे.जे. रुग्णालयातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तटंचाईची गंभिर समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे विक्राळी पार्क साईट येथील प्रसिद्ध अखिल पार्क साईट सेवा संघाने आपली सामाजिक बांधिलकी जपत महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या रक्तदान शिबिरात दिवसभरातील अवघ्या आठ तासांत तब्बल २७० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
सामाजिक कार्यकर्ते सुनील काजरोळकर हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या एकमेव राजकारणविरहित असलेल्या सामाजिक संस्थेच्या या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन भाभा अनुसंशोधन केंद्राचे वैज्ञानिक अधिकारी सुबिर कुमार भट्टाचार्य व डॉ. एल.एच.हिरानंदानी रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापक भुषण पवार या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.रोटरी क्लब ऑफ मुंबई घाटकोपर यांनी या रक्तदान शिबिरास विशेष सहकार्य केले.यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा अमिता लोडया व माजी अध्यक्ष हरजींदरपाल सिंगला आवर्जून उपस्थित होते. राजावाडी रुग्णालय रक्तपेढीचे वैदयकिय अधिकारी डॉ. काशिनाथ जाधव समन्वयक अश्विनी लोहार,सर जे.जे. महानगर रक्तपेढीचे वैदयकिय अधिकारी डॉ.सचिन चौधरी, जनसंपर्क अधिकारी प्रतिभा घोरपडे व त्यांच्या वैद्यकीय पथकाच्या सहकार्याने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास सर्वच राजकिय पक्षातील अनेक मान्यवर उपस्थित होते.तर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अखिल पार्क साईट सेवा संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या