सीसीटीव्हीच्या आधारे तासाभरात रिक्षा शोधली ..
त्या महिलेचे ७ तोळ्यांचे दागिने परत केले
डोंबिवली ( शंकर जाधव ) लग्न समारंभ आटोपून कुटुंबीय रिक्षाने घरी परतले.मात्र कुटुंबीय त्यांची दागिन्यांची बॅग रिक्षात विसरलेले..रिक्षाचा नंबर लक्षात नसल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाणे याबाबत माहिती दिली.पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने रिक्षा शोधून काढली आणि महिलेचे सात तोळे दागिने तिला परत केले .अवघ्या तासाभरात पोलिसांनी दागिने शोधून परत केल्याने महिलेने मानपाडा पोलिसाचे आभार मानले.
मिळालेल्या माहीतीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील दावडी परिसरात राहणाऱ्या शोभा गायकवाड यांच्या मुलीच्या मैत्रिणीचे दादर येथे लग्न होते .या लग्नासाठी सर्व कुटुंबीय दादरला गेले होते .लग्न समारंभ आटोपून रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गायकवाड कुटुंबीय डोंबिवली रेल्वे स्थानकावर पोहचले .तेथून दावडी येथे घरी जाण्यासाठी रिक्षात बसले. रिक्षात उतरून काही वेळाने गायकवाड कुटुंबियाना रिक्षातच बँग विसल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत रिक्षा चालक निघून गेला होता .गायकवाड यांच्याकडे रिक्षाचा नंबर नव्हता. त्यांनी तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली .मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे यांच्या पथकाने तपास सुरू केला .स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले .या सीसीटीव्हीत ती रिक्षा आढळून आली .रिक्षाच्या व्ह्यूड वर पांढर्या रंगाची पट्टी होती .रिक्षाचा नंबर व त्या पट्टीच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला. पोलिसांनी गायकवाड यांना त्यांचे दागिने परत केले.
बाईट- बाळासाहेब पवार ( पोलीस निरीक्षक , मानपाडा पोलीस ठाणे )
0 टिप्पण्या