दोन तरुणांचे जीव वाचवणाऱ्या पोलिसाचा सत्कार
कल्याण ( शंकर जाधव ) भररस्त्यात दोन तरुणांचे धारदार शस्त्राने वार करून जखमी करण्याच्या प्रयत्न करत असताना हल्लेखोराला कोळसेवाडी पोलिसांनी पकडून युवकाचा जीव वाचवला.या पोलिसाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असताना शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी सत्कार केला.
कल्याण येथील काटेमानिवली परिसरातभर रस्त्यात झालेल्या भांडणात एका तरुणाने दोन तरुणांवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतांनाच या ठिकाणाहून गस्तीवर जात असलेले पोलिस हवालदार प्रवीण देवरे, पोलिस नाईक उत्तम खरात आणि कुणाल परदेशी यांनी प्रसंगावधान ओळखून हल्लेखोराला पडकून अटक केली. दोन तरुणांचे प्राण वाचविणारे पोलिस हवालदार प्रवीण देवरे, पोलिस नाईक उत्तम खरात आणि कुणाल परदेशी या पोलिस कर्मचार्यांचे कौतुक व्हावे आणि अन्य पोलिसांचेही अशा गंभीर परिस्थितीत मनोधैर्य वाढावे या उद्देशाने माजी नगरसेवक महेश दशरथ गायकवाड यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

0 टिप्पण्या