कल्याणात तरुणावर धारदार शस्त्राने वार.. दोघांना अटक

 कल्याणात तरुणावर धारदार शस्त्राने वार.. दोघांना अटक 



डोंबिवली ( शंकर जाधव ) 'भाई' बोलला नाही म्हणून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना कल्याण मध्ये घडली आहे.या प्रकरणी  बाजारपेठ पोलिसांनी  हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना जणांना अटक केली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार,अक्षय भालेराव आणि त्याचे मित्र शनिवारी रात्री एका ढाब्यावर पार्टीसाठी गेले होते.  आपसात वाद सुरू असताना बाजूला विजय शिंदे आणि रवि वाघे हे उभे होते. यांच्यासोबत वाद होऊ नये म्हणून अक्षयने मित्राला बाजूला केले. त्यावेळी अक्षय भालेराव याने  विजय शिंदेला विजय असा एकेरी उल्लेख केला. तसेच वाद नकोत असे बोलून मित्राला बाजूला केले. याचा राग मनात धरून विजय शिंदेने रात्री अक्षयला  रस्त्यात आडवून मला विजय का बोलला 'भाई' बोलता येत नाही का याचा जाब विचारला आणि अक्षयला मारहाण केली.  त्यावेळी अक्षयने त्याचा भाऊ विशाल भालेरावला फोन करून  घडलेला प्रकार सांगितला. त्यावरून घटनास्थळी आलेल्या विशाल भालेराववरही धारदार शस्त्राने वार करण्यात आले .या प्रकरणी   जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात बाजारपेठ पोलिसांना  बेड्या ठोकल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या