जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था कडून सरळगाव विभाग हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप
जिजाऊ एक आधारवड हे संस्थेचे ब्रीद असणाऱ्या या संस्थेने खरोखर गोर गरीब,वंचित, दुबळ्या, समाजातील जनतेचे दुःख जाणून अश्रू पुसण्याचे काम संस्था समाजसेवेच्या माध्यमातून ठाणे पालघरच नव्हे तर संपूर्ण कोकणात जिजाऊचा ध्यास कोकणचा विकास ह्या उक्तीप्रमाणे शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला साक्षमीकरण आणि कृषीविकास हिच पंचसूत्री राबवत आहे. संस्थेचे संस्थापक मा. निलेश सांबरे साहेबांच्या ह्या समाजसेवा व्रताने सांबरे साहेब दीन दु बळ्या गरीब जनतेच्या व युवकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत
आज सरळगाव विभाग हायस्कूल मधील विध्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले तदनंतर विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. बी. पाटील सरांनी आपल्या मनोगतात सांबरे साहेबांचे व जीजाऊ ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आभार मानून सांबरे साहेबांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवास्पद भाष्य केले
यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयातील सहशिक्षक संजय इधे सर यांनी केले तर शेवटी विद्यालयातील जेष्ठ शिक्षिका सौ. सोनावणे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले

0 टिप्पण्या