नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दापूर गावात क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था संचलित आदिती रघुनाथ आव्हाड स्मृर्ती ज्युनियर कॉलेज इमारतीच्या प्रांगणात आदिती यांच्या शिल्प पुतळ्याचे अनावरण सोहळा रविवार दिनांक ०२\०१\२०२२ दोन जानेवारी२०२०रोजी सकाळी नऊ वाजता होत असून, कृपया वृत्तपत्र,आणि प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धीबाबत सस्नेह आमंत्रण. सोबत लेख फोटोसह प्रसिद्धीसाठी सहकार्य अपेक्षित आहे.
!!कर्मयोगी!!
लेखक:-दत्ताराम घुगे,मुंब
ही यशोगाथा आहे,ग्रामीण भागातून जगभरातगरूडझेप घेत असलेले आदर्श व्यक्तीमत्व रघुनाथ म्हाळूजी आव्हाड कौतुकास्पदआहे,शून्यातून विश्व निर्माण केलेला आदर्शमय आव्हाड कुटुंब सरळमार्गी,स्वच्छ प्रतिभेचा सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे.आजही आव्हाड परिवार शासनात कार्यरत मुंबई पोलीस वरिष्ठ निरीक्षक अनिल रामचंद्र आव्हाड, महसूल प्रशासकीय सेवानिवृत्त अधिकारी दामोदर म्हाळुजी आव्हाड, मुंबई पोर्ट ट्रस्ट सेवानिवृत्त व्यक्तीमत्व जनसेवक शिवाजी रामचंद्र आव्हाड समाजभूषण सर्वोच्च स्थानी असून त्यांची ओळख समाजमनावर कोरली आहे.त्यांची ही परिश्रमाची यात्रा तमाम वाचकांना प्रेरणादायक आहे.उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा सिन्नर तालुका दुष्काळी ओळखला जात होता.या तालुक्यातील दापूर गाव शैक्षणिक, सामाजिक, राजकीय तसेच शेती संबंधाने आदर्श गाव म्हणून जिल्ह्यात गणले जाते.दापूरची लोकसंख्या दहा ते पंधरा हजाराहून अधिक झाल्याने येथील ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन माळवाडी (दत्तनगर)आणि पालवेवाडी अशा दोन ग्रामपंचायती वेगळ्या झाल्या, दापुर गावाची लोकसंख्या ही मुळगाव तसेच बारा वाड्यामध्ये विभागलेली आहे.पुर्वी दुष्काळी गांव म्हणून ओळख असलेल्या दापुरची नवी ओळख भोजापुर धरणाने बदलली आहे.दापुरचे सर्व क्षेत्र हे पाण्याखाली आले आहे.अंदाजे सात किमी अंतरावरून भोजापुर धरणातून पाणी आणुन जिरायती शेतीचे बागायती शेतीत रूपांतर करण्यात आले.पूर्वीपासून गावांत असलेला प्रत्येक गावकरी यास दुष्काळावर मात करण्यासाठी शिक्षण एकमेव साधन आहे. याची जाणीव झाल्याने वर्षानुवर्ष अनेक पिढ्या सुशिक्षित होऊन शिक्षणाकडे आकर्षित झाल्या आहे. तर काहीनी आपल्या शेतकरी म्हणून समाधानी आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील आदर्शमय
दापूर गावच्या नेहरवाडीमधील कष्टकरी शेतकरी स्व.म्हाळुजी पुंजाजी आव्हाड हे दापुर गावचे गावकरी व तात्कालिक परिस्थितीत गावगाडा चालविणाऱ्या पाच माणसांपैकी ते एक होते.त्यांच्या धर्मपत्नी सरूबाई म्हाळूजी आव्हाड यांची प्रत्येक कामात साथ होती.त्यांच्या कुटुंब परिवार खूप मोठा होता.आजही वाढतोय. त्यांना सहा सुपुत्र आणि दोन सुकन्या. त्यापैकी थोरले रामचंद्र म्हाळुजी आव्हाड, लक्ष्मण म्हाळुजी आव्हाड, विठोबा म्हाळुजी आव्हाड, दामोदर म्हाळुजी आव्हाड, बाबुराव म्हाळुजी आव्हाड तासेच रघुनाथ म्हाळुजी आव्हाड, कन्या सत्यभामा,आणि कौशल्या.
म्हाळुजी आव्हाड यांच्या पाठीमागे कुटुंबाची जबाबदारी पितृतुल्य रामचंद्र म्हाळुजी आव्हाड यांच्याकडे आली ती यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली.
या पितृतुल्य वटवृक्षाच्या सावलीत सुसंस्कारात घडलेला कर्मयोगी रघुनाथ म्हाळुजी आव्हाड यांचा जन्म दापुर नेहरवाडी गावांत १५ ऑगस्ट १९५२ स्वातंत्र्यदिनी झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण दापुर जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिरात तर पुढील माध्यमिक शिक्षण नाशिक जिल्ह्यातील तालुका रयत शिक्षण संस्थेचे न्यु इंग्लिश स्कूल दापुर तर उच्च पदवीधर शिक्षण इंटर सायन्स हे जयहिंद काॅलेज चर्चगेट मुंबई, पुढे व्हीजेटीआय मुंबई येथून बी ई मॅकेनिकल इंजिनिअरिंग, तर बजाज इन्स्टिटय़ुट ऑफ
मॅनेजमेंट स्टडीज मुंबई आयसीडब्लुए, ऑल इंडिया ऑफ काॅस्ट अकाउंटिंग येथून MBA (Finance) शिक्षण पूर्ण करून कॅम्पसमधून जीकेडब्लु (गेस्ट किन व्हिलीएम्स ) भांडुप येथे पहिली नोकरी इमानइतबारे पंधरा वर्ष केली.
त्यांना लहानपणापासून पितृतुल्य जेष्ठ बंधू रामचंद्र म्हाळुजी आव्हाड यांचे सदैव कृपाछत्र आणि गुरूवर्य भानुसिंग परदेशी गुरूजींच्या तालमीत रघुनाथ यांच्या प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण घेत असतानाच त्यांच्या विचाराचा सुसंस्काराचा जडणघडण पुढील वाटचालीस मोठा फायदा झाला. त्यांच्याकडे बालपणापासून शालेय जीवनात नेतृत्व, कर्तृत्व, आणि वक्तृत्व गुण त्यांच्या रक्तात आजही आहे.
त्यांना इंजिनिअरिंग शिकण्याची प्रेरणा मिळाली के.के.आव्हाड आणि लक्ष्मण वाघ यांच्याकडून.त्याची घौडदौड सुरुवातीची पंधरा वर्षे जीकेडब्लू,पुढे ठाणे कळवा येथील प्रेशिशन्स फास्टनर्स लिमिटेड १० वर्ष नोकरीच्या वाटचालीत वाईस प्रेसिडेन्ट ऑपरेशन सर्वोच्च पद सांभाळत पाटर्नर ही झाले. नोकरीच्या दरम्यान महाविद्यालयात लेक्चर व्हिजिटिंग फॅकल्टी करीत इतर शिक्षण घेत नोकरीच्या अनुभवाच्यl अनुषंगाने त्यांचे लेक्चर त्या क्षेत्रातील सर्वांनाच आवडू लागले. रघुनाथ आव्हाड यांना नोकरी करीत असताना व्यवसायाची आवड निर्माण झाली.
त्यांनी कमीतकमी खर्चात उत्कृष्ट प्रकारची वस्तु निर्माण करून मार्केट देऊ शकतो याची खात्री झाल्यावर एक गाळा घेऊन आपल्या स्वव्यवसायाचा श्रीगणेशा केला.
व्यवसाय सुरू केला.अपेक्षित यश मिळाले.हा व्यवसाय वाढवित गेले. त्यांनी कंपनीत वरिष्ठ पदावर काम केल्याचा अनुभव आणि आपल्या उत्कृष्ट शिक्षणाचा लाभ यशस्वी उद्योजक होण्याचा बहुमान मिळाला. यामध्ये नोकरीतील अनुभवातून कामगारांकडून उत्कृष्ट काम कसे करून घ्यायचे आणि कामगार संघटनेशी सुसंवाद साधण्याची कला अवगत असल्याने खूप चांगल्या प्रकारे काम करीत ते नोकरीत असताना देशाविदेशात कामधंद्याच्या निमित्ताने जगभरातील उद्योजकांशी संबंध दृढ झाले होते. रघुनाथ रामचंद्र आव्हाड राष्ट्रीय कार्यात यशस्वी उद्योजक म्हणून देशाच्या संरक्षण, अनुविज्ञान,अवकाशयान शासक इत्यादी क्षेत्राला लागणारे साहित्यसामुग्री तयार करीत,चांगला उच्च प्रतीचे उत्पादन,मालाचा दर्जा हा चांगला असल्याने त्याचे महत्त्व वाढत गेले.
आपल्या भारत देशाच्या प्राधान्य क्रमात अणुविज्ञान ,संरक्षण, अवकाशयान यांच्याशी संबंधित उत्पादन उपलब्ध करण्याचे राष्ट्रीय कार्याचे भाग्य लाभल्याचे अभिमानास्पद उल्लेख करतात. आता तर या व्यवसायात त्यांचे सुपुत्र प्रियांक यांनीही वडीलाप्रमाणे इंजिनिअरिंग केल्याने या व्यवसायात त्याचा सहभाग मिळाल्यामुळे रघुनाथ आव्हाड यांच्या वरचा कामाचा बोजा कमी होऊ लागला.विशेषत रघुनाथ आव्हाड यांच्या धर्मपत्नी सौ.वैशाली या दीर्घकालीन जिवनसाथी आजही त्यांच्या खांद्याल्या खांद्या लावून रघुनाथ आव्हाड यांच्या वयाच्या सत्तरीत वर्षात काळजी घेत आहे.त्या खूप चांगल्या आदर्शवत गृहिणी आणि नोकरी करीत मुलगी, मुलगा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मायेने आजही सांभाळत आहेत.
रघुनाथ आव्हाड यांनी उच्च शिक्षण घेऊन फक्त स्वत:च्या संसार न करता सामाजिक, शैक्षणिक, तसेच सांस्कृतिक क्षेत्रात दर्जा वाढविण्यासाठी निस्वार्थपणे मोलाचे कार्य केले.
यांचे उत्तम उदाहरण म्हणजे
त्यांची उच्चशिक्षित मुलगी डॉक्टर आदीती रघुनाथ आव्हाड हिच्या परदेशात अपघाती निधनानंतर ते कोलमडून न जाता आपल्या ग्रामीण भागात दापुर गावांत डॉक्टर आदितीच्या नावाने नाशिक जिल्ह्यातील वसंतराव नाईक शिक्षण संस्थेला बारा रूमचे महाविद्यालयीन इमारत अटी व शर्तीविना बांधून दिली.
ही शैक्षणिक इमारत उभारून सुसज्ज आधुनिक सुखसोई युक्त वास्तुची देखभाल अनेक वर्ष रघुनाथ आव्हाड आजही निस्वार्थपणे करीत आहे.संस्थेने डॉक्टर आदिती रघुनाथ आव्हाड ज्युनियर कॉलेज दापुर असे नाव काॅलेजला दिले.तसा कायदेशीर प्रस्ताव मंजूर करून घेतला.काॅलेजला फेन्सींग करून घेतले.दहा संगणक असलेले स्वतंत्र संगणक कक्ष तयार करून केला.आजही ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थीगण संगणकाचे प्रशिक्षण घेत आहेत. हे सर्व करताना कोणताही स्वार्थ,किंवा पैसा कमविण्याचा हेतु नव्हता.ग्रामीण भागातील अनेक मुलंमुली शिकुन डॉक्टर आदिती सारखे उच्च शिक्षित व्हावेत हाच एकमेव हेतू आहे. जिल्हात,राज्यात शैक्षणिक मुक्त शासकीय धोरणात्मक अनेक सहकार सम्राट, शिक्षणमहर्षी यांच्या शैक्षणिक व्यवसायिक विद्यालये महाविद्यालयीन स्पर्धा जागोजागी आहे.पण ही पुण्यशील शैक्षणिक वास्तु गोरगरीब सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात विद्यार्धीगण सुशिक्षित आदर्श नागरिक घडावे. सद्याच्या इमारत तळमजला व पहिला मजला असलेल्या इमारतीवर दुसरा मजला कसा वाढविता येईल. अद्ययावत ग्रंथालय, उत्कृष्ट प्रयोगशाळा,माहिती तंत्रज्ञान
शिक्षण स्तुत्य उपक्रमाच्या उभारणीचा विचार डॉक्टर आदिती यांचे पितामह, वैज्ञानिक, संशोधक, विचारवंत रघुनाथ म्हाळुजी आव्हाड यांच्या सतत घोळत असतात.संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील आदर्शमय दापुर गावांतील वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या डॉक्टर आदिती रघुनाथ आव्हाड ज्युनियर कॉलेज वास्तुच्या प्रांगणात मध्यभागी डॉक्टर आदिती रघुनाथ आव्हाड यांच्या शिल्प पुतळ्याचे काम नववर्षात साकारत आहे.
याआव्हाड परिवारात महसुल विभागात सेवानिवृत्त शासकीय,अधिकारी दामोदर म्हाळुजी आव्हाड, अनिल रामचंद्र आव्हाड (प्रभारी पोलीस निरीक्षक जनसंपर्क) तर बीपीटी सेवानिवृत्त शिवाजी रामचंद्र आव्हाड अशी शासकीय निमशासकीय, वैद्यकीय, इंजिनिअरिंग, विविध क्षेत्रात उच्च स्थानी कार्यरत आहेत. ही सुपुत्र तमाम ग्रामस्थांच्या कल्याणार्थ धावपळीत आहे.सर्व गावकरी या कुटुंबियाच्या बरोबर समरस झालेले आहे.!खरा स्वार्थ तोचि करी ज्याचा स्वार्थ समाजाउध्दरी! या उक्तीनुसार कर्मयोग सत्वपुरूष समाजभूषण आहे.
कर्मयोगी =
रघुनाथ म्हाळुजी आव्हाड
यांचा संपर्क मोबाईल नंबर
9821248368.
.......प्रेषक/लेखक =
दत्ताराम पुंजाजी घुगे
मुक्तपत्रकार, लेखक
४०५अ शिवम,संत तुकाराम महाराज चौक,युनियन बँक समोर, छत्रपती शिवाजी महाराज काॅम्प्लेक्स ,आनंद नगर, दहिसर पूर्व मुंबई 68
मोबाईल नंबर
9821793708
Email ghuge.dattaram@gmail.com
19/12/2021
प्रती आदरणीय संपादक
दैनिक
विषय =आपल्या लोकप्रिय दैनिकात दिनांक एक जानेवारी अथवा दोन जानेवारी या दिवसा दरम्यान सदर लेख फोटोसह ग्रामीण भागातील कर्मयोगी रघुनाथ म्हाळुजी आव्हाड यांची समाजापयोगी यशोगाथा प्रसिद्धीबाबत विनंती.धन्यवाद!
महोदय, सप्रेम नमस्कार !
आपणांस नम्र विनंती करीत आहे.उपरोक्त प्रासंगिक लेख फोटोसह प्रसिद्धीबाबत कृपया शैक्षणिक सामाजिक स्तुत्य उपक्रमास सहकार्य करावेत ही विनंती.धन्यवाद
आपला स्नेहांकित
दत्ताराम पुंजाजी घुगे
दहिसर, मुंबई.

0 टिप्पण्या