कल्याण डोंबिवली परिसरातील नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडणारे टॅन्कर पकडले जाणार

 कल्याण डोंबिवली परिसरातील नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडणारे टॅन्कर पकडले जाणार 



डोंबिवली ( शंकर जाधव )  कल्याण डोंबिवलीतील नाल्यात केमिकल मिश्रित सांडपाणी  टँकरमधून नाल्यात सोडल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळाल्या.हे टँकर पकडण्यासाठी मंडळासह कामा संघटना, स्थानिक पोलीस आणि जागरूक नागरिकांनी प्रयत्न केले.आता पोलिसांनी या परिस्थितीवर तोडगा काढला आहे. हे टँकरवर वॉच ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी ,पोलीस प्रशासन आणि आरटीओ यांच्या माध्यमातून संयुक्त पथक तयार करण्यात आले. नाल्याच्या परिसरात या पथकाचा वॉच राहणार असून केमिकल टँकर नदी नाल्यात सोडल्यास कायदेशीर कारवाई करुन टँकर कायम स्वरुपी जप्त केला जाणार आहे.



        केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया करुन  नाल्यात सोडले जात असले तरी काही केमिकल कंपन्या या केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता टँकर च्या माध्यमातून थेट नदी नाल्यात सोडत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात. त्यामुळे उल्हास नदी वालधुनी नदीचे प्रदूषण होत आहे. अशा टँकरवर वॉच ठेवण्यासाठी संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये आरटीओ सह प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि स्थानिक पोलिसांचा समावेश आहे. या संयुक्त पथकाकडून केमिकल टॅन्करवर वॉच ठेवला जाणार आहे. हे टँकर विशेषत: रात्रीच्या अंधारात फिरतात. संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेर्पयत हा वॉच अधिक जागरुकपणो ठेवला जाणार आहे. यापूर्वी उल्हास नदी आणि वालधूनी नदी पात्रत रासायनिक टँकरने केमिकलयुक्त सांडपाणी सोडल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. तसेच गुन्हा दाखल करुन चालकाच्या विरोधात कारवाईही करण्यात आलेली आहे. आत्ता हीच कारवाई अधिक तीव्र करण्यावर संयुक्तीक पथक भर देणार आहे. पोलिस अशा टँकर चालकाला अटक करुन त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करतील. पर्यावरण हानी पोचवून प्रदूषण केल्या प्रकरणीही कारवाई केली जाईल. त्याचबरोबर आरटीओकडून अशा प्रकारचा टँकर कायम स्वरुपी जप्त केला जाईल असे कल्याण आरटीओ तानाजी चव्हाण  यांनी दिली.तर अश्या टँकरचालकांवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी कामा संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ.देवेन सोनी यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या