आम्ही कसे घडलो ? साहीत्यिकांचा जीवन प्रवास

 आम्ही कसे घडलो?

साहीत्यिकांचा जीवन प्रवास


चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर यांची घेतलेली मुलाखत 

(दि. : १२ डिसेंबर २०२१)


१) आपला लेखनात कसा प्रवास सुरु झाला?

लेखन प्रवास: मी कॉलजला गेलो तेव्हा मला मराठी काव्य लेखनाची व कथा लेखन करण्याची आवड लागली होती


२) आपले आदर्श कोण?

 माझे आदर्श: माझे कॉलज मधील  गुरु प्राध्यापक श्री.डी.टी.खांदवे  सर- न्यू आर्टस अँड कॉमर्स कॉलेज, पारनेर,

जिल्हा : अहमदनगर.

३) वयाच्या कितव्या वयापासून आपणांस लिखाण करण्याची सवय निर्माण झाली?

 वयाच्या १८ व्या वर्षापासून लिखाणाची सवय जडली.

४) आपले आईवडील साहित्यिक होते का ? कोणाचा प्रभाव तुमच्या वर पडला?

माझे आई वडील निरक्षर होते  ते साहित्यिक नव्हते पण लिखाणाची प्रेरणा व ऊर्मी  त्यांच्या पासुन मला लाभली.

५) आता पर्यंत  कोणत्या प्रकारचे लिखाण आपण करीत आहात आणि एकूण किती पुस्तके प्रकाशित झाली?

आता पर्यंत काव्य लेखन, कथा लेखन तसेच लेख लेखन असे साहित्य लिहले आहे. व माझे पहिला काव्यसंग्रह पुणे

येथे प्रकाशित झाला आहे काव्य संग्रहाचे नाव आहे: 

 "शब्द गंगा " काव्य संग्रह 

६) सध्या आपण करीत असलेला व्यवसाय कोणता ? किंवा नोकरी करत आपण ही लिखाणाची कला कशी जोपासना करीत आहात याबद्दल थोडेसे सांगावे

 सध्या मोहिते पाटील विद्यालय मानखुर्द येथे उप मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. ही लिखाणाच्या कलेला मला

नेहमीच माझे आई वडील तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष एन.टी.शिंदे सर व शाळेचे खजिनदार, मुख्याध्यापक 

श्री.एस.एस.जाधव सर व शिक्षक सहकारी यांनी सतत प्रोत्साहन दिले व कौतुकाचा वर्षाव केला.

७) प्रकाशीत पुस्तकांची नावे व एखादा फोटॊ पाठवले तरी चालेल

 प्रकाशीत पुस्तक:" शब्द गंगा काव्य" संग्रह , प्रकाशीत ठिकाण : पुणे .





८) सध्या आपण राहत असलेले ठिकाण व इतर आपल्या बध्दल माहिती 


 चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर

       मोरेश्वर कॉम्पलेक्स, डी- ४०३

        सेक्टर - १८ , गोकुळ डेरी समोर

        कामोठे, नवी मुंबई 

      तालुका: पनवेल ,

       जिल्हा : रायगड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या