जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प
ठाणे, दि. १० (प्रतिनिधी) : आज जागतिक मानवी हक्क दिनी, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट त्यांच्या तरुण आणिउद्यमशील संस्थापिका अद्वैतेषा बिर्ला यांच्या पुढाकाराने सुरु होत असलेल्या ‘ऊजास’ संस्थेतर्फे महिलांच्या मासिक पाळीबाबत आरोग्य विषयक जनजागृती व व्यवस्थापन करणार असल्याचे सांगितले.
महिलांच्या सादरीकरणाच्या आधीच्या टप्प्यात, महाराष्ट्रातील अमरावती, पालघर, ठाणे आणि वाशीम जिल्ह्यातील ग्रामीण भागात पथदर्शी प्रकल्प आधीपासूनच सुरु झाले आहेत. मासिक पाळीच्या काळातील आरोग्य स्वच्छता विषयक कार्यशाळा आणि सॅनिटरी पॅड्सचे वितरण महाराष्ट्रातील सांगली, अहमदनगर आणि गडचिरोली जिल्ह्यात करण्यात आले आहे. कोल्हापूर आणि कोकण भागात यावर्षीच्या पूराच्या आपत्तीच्या वेळी ऊजासने पुनर्वसनाचे काम केले आहे. आपल्या कार्याचा ठसा केवळ ग्रामीण भारतात न उमटविता, ऊजासने भायखळा येथील महिला कारागृह आणि ठाणे मध्यवर्ती कारागृह येथील कैद्यांनाही मदत पुरवली आहे.
ऊजासच्या सादरीकरणाबद्दल बोलताना संस्थापिका अद्वैतेषा बिर्ला म्हणाल्या, “मासिक पाळीच्या काळातील आरोग्य जपणे हा तरुण मुली आणि स्त्रिया यांच्या तब्बेतीच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. या गोष्टीला लागलेला कलंक, चुकीचे दृष्टीकोन, स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक यामुळे या मुद्द्याला पुरेसे महत्व दिले जात नाही आणि काळाच्या ओघात या काळात स्त्रियांना दुर्लक्ष किंवा असमानतेची वागणूक मिळते. या गोष्टी विषयी असलेल्या खोलवर रुजलेल्या गैरसमजुतींमुळे मासिक पाळीशी संबंधित गरजा आणि समस्या व्यक्त करायलाही मुली आणि स्त्रियांचा अटकाव होतो. मासिक पाळीच्या काळातील आरोग्य आणि व्यवस्थापन या संदर्भात व्यापक आणि समग्र दृष्टीकोन राबविण्यावर ऊजासचा भर आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजावर सकारात्मक प्रभाव टाकण्याचा आणि मासिक पाळीच्या संदर्भातील समाजाचा चुकीचा दृष्टीकोन बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यांनी सांगितले.

0 टिप्पण्या