डोंबिवलीतील एमआयडीसी परिसर कचरा मुक्त करण्यासाठी बैठक

 डोंबिवलीतील एमआयडीसी परिसर  कचरा मुक्त करण्यासाठी बैठक



डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महापालिकेत शिळफाटा मार्गे येताना एमआयडीसी परिसरात जागोजागी कचरा पडलेला दिसतो.त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या . त्यानुसार डोंबिवली  एमआयडीसी परिसर कचरामुक्त करण्याच्या अनुषंगाने कामा संघटनेच्या कार्यालयात संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ.देवेन सोनी,  एमआयडीसीचे उप अभियंता पतंगे, महापालिका घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे, 'ई'प्रभागाचे सहायक आयुक्त भारत पवार, आरोग्य अधिकारी नरेंद्र धोत्रे,  अनिकेत धोत्रे यांच्या उपस्थितीत  घनकचरा व्यवस्थानाबाबत बैठक पार पडली. एमआयडीसी परिसरातील पडणारा  फेज १व फेज २ मधील कंपन्यातील  सुका कचरा  व झाडांचा पालापाचोळा यांचे संकलना व विल्हेवाट लावण्यासाठी खाजगी संस्था नेमणे व रस्त्यावर कचरा टाकणा-या नागरिकांविरूध्द कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याकरीता  संयुक्तिक भरारी पथक नेमणे व  कचरा निर्माण करणारे आठवडे बाजार बंद करणे इत्यादी बाबींवर चर्चा झाली. इंडस्ट्री मधील प्लास्टिक, कागद इ. सुका कचरा महानगरपालिकेने  नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत उचलण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. दर १५ दिवसांनी  संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल, असाही  निर्णय बैठकीत घेण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या