डोंबिवलीतील पुंडलिक पै यांना 'मराठी भाषा गौरव सन्मान' प्रदान
डोंबिवली ( शंकर जाधव ) टीव्ही पत्रकारांचा दिवाळी अंक 'न्यूजरूम लाईव्ह 2021' तर्फे यंदा डोंबिवली येथील पै फ्रेंड्स लायब्ररीचे सर्वेसर्वा पुंडलिक पै यांना माजी मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते 'मराठी भाषा गौरव सन्मान' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार संघात हा पुरस्कार सोहळा पार पडला.३६ वर्षे लायब्ररीच्या माध्यमातून मराठी भाषेसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत वाचनाला घराघरांत पोहोचवणाऱ्या पुंडलिक पै यांचे नाव महाराष्ट्रातच नव्हे ते देशात प्रसिद्ध आहे.'न्यूजरूम लाईव्ह २०२१' या दिवाळी अंकाचे प्रकाशन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात याचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांना प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रित करण्यात आले असून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची विशेष उपस्थिती होती.डोंबिवलीतील पै लायब्ररीत विविध विषयांवरील मराठी व इंग्रजी भाषेतील साडे तीन लाखापेक्षा जास्त पुस्तके, डोंबिवलीतील चार वेगवेगळ्या ठिकाणी वाचनालयाची शाखा, १ जानेवारी २०१५ रोजी एका दिवसात १०२१ सभासद नोंदणी करून थेट `लिम्का बुक्स रेकॉर्डस`मध्ये नाव, बाल गोपाळांसाठी इंग्रजी व मराठी पुस्तकांचा खजिना,भारतात पहिल्यांदा `पुस्तके आदान-प्रदान प्रदर्शन २०१७`,बालकुमारांसाठी दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी लेखक बालवाचक महोत्सव हे या लायब्ररीचे वैशिष्टे आहेत.

0 टिप्पण्या