कल्याणात मुंगूस शिकार करणाऱ्या चौघांना अटक
कल्याण ( शंकर जाधव ) कल्याण फोर्टीस् हाँस्पीटल परिसरात बुधवारी सकाळी मुंगुसाची शिकार केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चौघांना अटक करून कल्याण वनखात्याच्या ताब्यात दिले.
साधेदुखीवर औषध म्हणून मुंगुसाच्या चरबीच्या तेलाला मोठी मागणी असते.तर मुंगूसच्या केसाचा वापर ब्रश बनविण्यासाठी होतो. यामुळे मुंगूसला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने आरोपींनी मुगंसाची शिकार केली असावी असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी संजू समय्या मोटम (वय 32), भोलानाथ शंकर पास्तम (वय 30), जलाराम समय्या पास्तम (वय 32), बसवय्या शंकर पास्तम (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे असून आरोपी मांडा टिटवाळा येथील व वासुंद्री रोड परिसरात राहतात.
बाईट :- रघुनाथ चन्ने (कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी

0 टिप्पण्या