दुःखद बातमी : लाडके पितृतुल्य व्यक्तीमत्व हरपले
कणकवली : (दिनांक ९ नोव्हेंबर २०२१)
सिधुदुर्ग जिल्हा कणकवली तालुक्यातील नरडवे महम्मदवाडी येथे जन्मगाव असलेले सध्या ठाणे येथे वास्तव्य करत असलेले व समाजसेवेचा ध्यास असलेले व्यक्तीमत्व दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ रोजी अचानक संध्याकाळी ४.३० सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या ७७ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने नरडवे धरणग्रस्त आणि ढवळ परिवार यांना फार दुःख होत आहे, आज काळाने पितृतुल्य व्यक्तिमत्वाला हिरावून नेले गेल्याने सर्व नरडवे स्थानिक लोकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
नरडवे धरणग्रस्त समितीचे आधारस्तंभ व पितृतुल्य व्यक्तिमत्व सल्लागार मा. कै.मारुती भाऊ ढवळ यांची संध्याकाळी ४.३० च्या वाजण्याच्या सुमारास कणकवली स्टेशन येथे प्राणज्योत मालवली,
सकाळी ठाणे ते कणकवली मांडवी गाडीने प्रवास चालू होता कणकवली स्टेशन येथे उतरल्यावर त्यांना स्टेशन पार करताना ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली
आत्म्यास चिरशांती व सद्गती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून समितीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏

0 टिप्पण्या