लुईस बस्त्यांव डिसोझा यांस वाढदिवसाच्या निमित्ताने कवी हरिसंतोषाच्या लाखों शुभेच्छा!

 

लुईस बस्त्यांव डिसोझा यांस वाढदिवसाच्या निमित्ताने

कवी हरिसंतोषाच्या संतोषमय लाखों शुभेच्छा!



प्रिय मित्रा लुईस उर्फ बाकल्या 

तुला फराळात आवडती चकल्या 


 तुम्ही कुणीही विसरलात जरी आम्हाला 

 तरी आम्ही आठवण करू वाढदिवसाला 


प्रत्यक्ष भेटून चकल्या होत्या भरवायच्या 

पण समजून घे मित्रा, या  शब्दरूपी फराळाच्या शुभेच्छा !



मन वळू नये अशी श्रद्धा हवी 

 निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी 

 सामर्थ्य संपू नये,अशी शक्ती हवी 

 कधी विसरू नये अशी नाती हवी


तुझा खेळकर स्वभाव आणि इतरांना शक्यतो न दुखवता संभाळून घेण्याची तुझ्यातली ती कला, स्वभाविक वृत्ती दिसून येते, आपल्या लोकांवरती असलेले प्रेम, जिवाभावाप्रमाणे असलेली ती तळमळ, तुझ्यात दिसून येते,  आमच्या मुंबई कमिटी बरोबरच्या सर्व पदाधिकारी यांच्या मताशी एकरूप राहून, उपाध्यक्ष पदाचा आदर करीत आज सर्व समाजाचे, धरणग्रस्तांचे भले व्हावे या विचाराने तू आज पेटून उठून आज आम्हा सर्वांबरोबर तू एकनिष्ठ राहून पाऊल कुठे वाकडे न टाकता एकमार्गी राहिलास,  विश्वासाला जागणारा तू, असे तुझ्यासारखे खंबीर नेतृत्व आम्हाला मिळाले आहे, अशा आमच्या वाघासारखे कार्य  करणाऱ्या मित्राचा म्हणजेच लुईस बसत्याव डिसोझा याचा आज 9 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे, त्या निमित्ताने यशस्वी यशवंत आणि किर्तीवन्त होवो असे अभिष्टचिंतन करतो.

येशू चरणी, आई अंबादेवी व ब्राह्मण देवाचरणीं  तुला शतायुष्य लाभो, अशी प्रार्थना आम्ही करीतो आहे,आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने कवी संतोष सावंत आणि परिवार यांसकडून लाख लाख शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या