विचारधन ईबुक प्रकाशन समारंभ उत्साहात संपन्न
दिनांक ७नोव्हेंबर रविवार रोजी प्रदीप कासुर्डे संकलित विचारधन ईबुकचा ऑनलाईन प्रकाशन समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक वाचन करून झाली. यांनतर धनश्री महाजन हिने माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही प्रार्थना सादर केली. यानंतर मान्यवर परिचय व मनोगत प्रदीप कासुर्डे यांनी व्यक्त केले. प्रदीप सर यांची कन्या निधी हिच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते मा. बाबुराव कासुर्डे, महाअनिस राज्यसरचिटणीस नितीनकुमार राऊत,मुख्याध्यापिका प्रविणा देऊलकर, मानवी हक्क अभियान मुंबई अध्यक्ष दत्ता आव्हाड, साहित्यिक उपक्रमशील शिक्षक लिलाधर महाजन, महाअनिस औरंगाबाद कार्याध्यक्ष भाऊसाहेब पठाडे, महाअनिस नवी मुंबई कार्याध्यक्ष अशोक निकम, तसेच इतर मान्यवर, साहित्यिक,सहकारी उपस्थित हॊते. हे पुस्तक विद्यार्थीवर्ग, शिक्षकवर्ग, तरुणवर्ग यांना खूप उपयोगी पडणारे असून जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवूया असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

0 टिप्पण्या