विश्वनाथ पंडित
चिपळूण : प्रयोगशील शिक्षण, पर्यावरण व संवर्धन, निसर्ग व संतुलित विकास, महिला कष्टकरी व उपेक्षित समूहाचे संघटन, हक्क निर्धारण. संस्थेच्या एकूण कामातील महत्त्वाचा उपक्रम सातत्याने शिक्षणाबाहेर राहणाऱ्या समाज घटकांच्या जीवन पद्धतीचा वेध व त्यास अनुसरून शिक्षणाची प्रयोगशील मांडणी आदी वंचित, उपेक्षित घटकांसाठी कार्यरत असणाऱ्या श्रमिक सहयोग कोळकेवाडी, चिपळूण संस्थेला जिजाऊ ब्रिगेड सावर्डे या संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन तेथील मुलांसाठी दिवाळी फराळ व मैदानी साहित्य संस्थेकडे सुपूर्त केले आणि दिवाळीचा एक दिवस मुलांच्या साथ सोबतीने दिवाळी साजरी केली.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अनुजाराजे भोसले, जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. दर्शना कृष्णकांत पाटील, सावर्डे शाखाध्यक्षा अनुष्का काजरोळकर, सचिव साक्षी गावणंग, आदिती निकम, डॉ. वर्षा खानविलकर, समिया मोडक, वैशाली गावडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

0 टिप्पण्या