कल्याण ( शंकर जाधव ) एक विषारी कोब्रा नागाने भक्ष्याच्या शोधात चक्क किचनमध्येच रात्रभर मुक्काम ठोकला होता. मात्र सकाळी घरातील एका महिलेला हा कोब्रा नाग किचनमधील भांड्यांच्या मागे दिसतात जिवाच्या भीतीने त्या घरातील कुटूंबांनी घराबाहेर धूम ठोकल्याची घटना घडली आहे.
कल्याण पश्चिमेकडील ग्रामीण भागात मोठमोठी गृह संकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहेत. तर जिल्ह्यात अचानक वातावरण बदल्याने बिळातून विषारी – बिन विषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसापासून वाढल्या आहेत. त्यातच कल्याण पश्चिम परिसरात उंबर्डे गावातील म्हसोबा नगरमध्ये जाधव कुटूंब राहते. काल रात्रीच्या सुमारास कोब्रा नाग अचानक त्यांच्या घरात शिरला होता. त्यांनतर नाग किचनमध्ये भांड्यांच्या मांडणीत दडून बसला.
मात्र सकाळी घरातील महिला किचनमध्ये गेली असता, तिला कोब्रा नाग दिसल्याने तिने घरच्यांना नागाची माहिती देत जिवाच्या भीतीने घराबाहेर पळ काढला. तर तिच्यामागेच घरातील सर्वच कुटुंब घाबरून घराबाहेर धूम ठोकली होती. नाग किचनमध्ये शिरल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोबे यांना संपर्क करून जाधव कुटूंबातील एकाने दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता काही वेळातच घटनास्थळी येऊन कोब्रा नागाला शिताफीने पकडले, नाग पकडल्याचे पाहून जाधव कुटुंबानी सुटकेचा निश्वास घेतला.

0 टिप्पण्या