नवजात बालकाची खरेदी विक्री करणाऱ्या पती पत्नीसह डॉक्टर विरोधात रामनगर पोलीस स्टेशन डोंबिवली येथे गुन्हा दाखल.

 नवजात बालकाची खरेदी विक्री करणाऱ्या पती पत्नीसह   डॉक्टर विरोधात रामनगर पोलीस स्टेशन डोंबिवली येथे गुन्हा दाखल.



जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला व्हॉट्स अॅप द्वारे सामाजिक कार्यकर्ताच्या मार्फत माहिती मिळाली कि, प्रिया संतोष अहिरे व संतोष अहिरे या दांपत्याने कल्याण येथील डॉ.केतन सोनी यांना आपले ५ दिवसाचे बाल १ लाख रुपये किंमतीला विकले आहे. याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,ठाणे  अॅड पल्लवी जाधव (बाल संरक्षण अधिकारी, ठाणे) व बाल कल्याण समिती  यांनी संगनमताने केस चे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित सामाजिक कार्यकर्ता सोबत चर्चा करून कारवाई करण्याचे ठरवले. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात आली. २३.११.२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता अॅड पल्लवी जाधव (बाल संरक्षण अधिकारी, ठाणे), सिद्धी तेलंगे, सखी वन स्टॉप सेंटर, श्रद्धा नारकर, ठाणे चाईल्ड लाईन यांनी डोंबिवली येथे जाऊन प्रिया अहिरे व सामाजिक कार्यकर्ता प्रकाश चव्हाण यांची भेट घेऊन सर्व परिस्तिथी समजून घेतली. 

डोंबिवली येथे राहणारी प्रिया संतोष अहिरे व संतोष अहिरे या दांपत्याने कल्याण येथील डॉ.केतन सोनी यांना आपले ५ दिवसाचे बाल १ लाख रुपये किंमती ला विकले. संबंधित दांपत्य हे गेल्या एक वर्षापासून डॉ. केतन सोनी यांच्या संपर्कात होते. त्यांचा मोठा मुलगा ८ वर्षाचा असून तो डॉ. केतन सोनी यांच्या कल्याण येथील नंददीप संस्थेत एक वर्षापासून राहत होता. महिला चार महिन्याची गर्भवती असताना तिने बाळाचा गर्भपात करण्याकरिता डॉ. सोनी यांना विचारणा केली असता त्यांनी गर्भपात का करता? त्या पेक्षा ज्या दांपत्यांना बाळ होत नाही अशा लोकांना तुम्ही ते बाळ देऊ शकता त्याचा तुम्हाला मोबदला मिळेल या करिता डॉ. त्यांचे वारंवार समुपदेशन केले. डॉ चालवत असणाऱ्या संस्थेत अशा गोष्टी घडत असल्याची निदर्शनास आलेले आहे. डॉ सांगितल्या नुसार अहिरे दांपत्यानी बाल होऊ देण्याचा विचार केला १०/११/२०२१ रोजी प्रिया अहिरे यांची शास्त्री हॉस्पिटल डोंबिवली येथे डीलेव्हरी झाली. तिने मुलाला जन्म दिला. डॉ नि त्याच वेळी दाम्पत्यांना संपर्क साधला व बाळ ची मागणी केली ठरल्या प्रमाणे १५/११/२०२१ रोजी डोंबिवली येथे डॉक्टरांनी त्या दांपत्याकडून १ लाख रुपये देवून त्यांचा कडील पेपर वर सही घेवून बाळाचा ताबा घेतला. १७/११/२०२१  प्रिया अहिरे यांना आपले बाळ परत हवे यामुळे त्यांनी डॉक्टरांना फोन करून मला बाळ परत हवे असे सांगितले. तुमचे पैसे मला नको मला बाल हवे असे बोलल्या वर आता तू बाळा ला विसर आता बाळा वर तुझा काहीही अधिकार नाही असे उत्तर दिले. त्या महिलेने डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ता प्रकाश चव्हाण यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला व बाळ मिळावे याची विनंती केली. अॅड पल्लवी जाधव (बाल संरक्षण अधिकारी, ठाणे), सिद्धी तेलंगे, सखी वन स्टॉप सेंटर, श्रद्धा नारकर, ठाणे चाईल्ड लाईन महिलेकडून सर्व गोष्टी समजून घेतल्या नंतर सदर महिलेला सोबत घेवून रामनगर पोलीस स्टेशन गाठले. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सांडभोर साहेबांना भेटून तसेच ए.सी.पी. मोरे साहेबांना भेटून सर्व प्रकार सांगितला संध्याकाळी ७ वाजता बाळाचा ताबा घेण्यात सर्वाना यश आले. परंतु रात्री १.३० वाजता तिन्ही आरोपी विरोधात बाल न्याय अधिनियम २०१५, कलम ८०, ८१ अंतर्गत गुन्हा दाखल झाला. सलग दुसऱ्या दिवशी भेट दिली असता डॉ केतन सोनी हे बेकायदेशीर बालकाश्रम चालवीत असल्याची माहिती या मिळाली त्या नुसार बाल कल्याण समिती यांना व पोलीस स्टेशन यांना अवगत केले.व सदर स्थळी भेट दिली. संस्थेत पोहोचल्यावर तेथे २९ मुले हजर होती. संस्था तपासणी करताना संस्थेत लहान मोठ्या मुलींचे कपडे वाळत असताना दिसले. संस्थेच्या कर्मचार्यांना या बद्दल विचारले असता मुली संस्थेत राहत नाहीत असे उत्तर दिले. बाकी च्या प्रश्नांना टाळा टाळ करत होते संस्थेत मुलींच्या बँगा मुलीचे कपडे, सॅनिटरी पॅड या सर्व गोष्टी तपासात भेटल्या आहेत. सदर गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता बाल कल्याण समितीने स्थानिक बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांनी संस्थेत अंदाजे २३ मुली आहेत व त्या इथून बेपत्ता असल्याची माहिती कळवली. त्या बरोबर बाजारपेठ पोलीस स्टेशन चे API सानप हे त्यांच्या अधिकाऱ्यानसह संस्थेत आले. संस्थेच्या संपूर्ण खोल्यांची तपासणी केली व सी सी टी व्ही फुटेज बघितले असता २३.११ २०२१ रोजीच्या रात्री ११.२० ते ११.३० दरम्यान काही मुले व मुलीना संस्थेतून बाहेर घेऊन जात असल्याचे दिसून आले. संस्थेतील कर्मचारी यांची सखोल तपासणी केली असता संस्थेच्या बिल्डींग पासून १० मीन च्या अंतरावर एका जुन्या बिल्डींग मध्ये मुले असल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांसह पल्लवी जाधव व सिद्धी तेलंगे यांनी सदर ठिकाणी जाऊन तपासणी केली असता तेथे ३८ मुले/मुली हे २ ते १३ वर्षे वयोगटातील बालके एका खोलीत कोंडून ठेवल्याचे आढळून आले. त्या मुलांना ताब्यात घेऊन संस्थेच्या बिल्डींग मध्ये बाल कल्याण समिती समोर आणण्यात आले. इतर आजूबाजूच्या ठिकाणांहून ६ मुलेसंस्थेत आणण्यात आले व एकूण ७१ बालके हि संस्थेत एकत्रित करण्यात आली. संस्थेच्या तपासणीत उपस्थित ७१ बालकांच्या कोणत्याही फाईल्स, रजिस्टर, बालकांशी संबंधित कोणतेच कागदपत्रे आढळून आलेले नाहीत. सदर तपासणीत डॉ. गर्भवती महिलांचे पेपर्स व कोऱ्या कागदावर दांपत्यांचे अंगठे असल्याचे पेपर्स देखील आढळून आलेले आहेत. ७१ मुलांना बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये सर्व शासकीय बालगृहात वयोगटानुसार ठेवण्यात आलेली आहेत. त्यांच्या पालकांची योग्य ती शहानिशा करून बालकांना बाल कल्याण समिती पालकांच्या ताब्यात देणार आहेत. संस्थेत उपलब्ध असलेले दस्तऐवज मुलांची माहिती मिळवण्यासाठी बाल कल्याण समितीने ताब्यात घेतले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या