संविधान दिनानिमित्त ऑनलाईन कविसंमेलन आणि मंचच्या लोगोचे अनावरण

  मंचच्या लोगोचे अनावरण



ओतूर - आज 26 नोव्हेंबर 2021 रोजी संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संविधान दिवसाच्या निमित्ताने "राज्यस्तरीय कार्यकारिणीची" बैठक संपन्न झाली.यामध्ये श्री.दिनेश चव्हाण (चाळीसगाव) यांनी  नव्याने (निःशुल्क) तयार केलेल्या मंचच्या "लोगोचे" अनावरण प्रा.डॉ. रजनी लुंगसे(तज्ञ सल्लागार) यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडले.कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.खं.र..माळवे (तज्ञ सल्लागार) यांनी संविधान आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यांनतर श्री.गजानन राखोंडे (उपाध्यक्ष) यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनतर श्री.संजय स्वर्गीय (स्वीकृत सदस्य) आणि सौ.सीमा भांदर्गे (स्वीकृत सदस्य ) यांनी संविधान दिन विशेष मनोगत व्यक्त केले.

त्यांनतर मंचचे सर्वेसर्वा ,कार्याध्यक्ष श्री.रणजित पवार यांनी आणि सर्व उपस्थित सदस्यांनी विधीतज्ञ सावित्री दमकोंडवार यांची कायदेशीर सल्लागार पदी निवड करण्यात आली.त्यास मंचचे अध्यक्ष श्री.राजेश साबळे यांनी अनुमोदन दिले.

त्यांनतर मंचच्या पुढील  वाटचालीसाठी चर्चा करण्यात आली.नवीन संकल्पना मांडण्यात आला त्यास सर्व उपस्थितांनी सहमती दाखवली.कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर सर्व राज्यकार्यकारिणी सदस्यांना निवड पत्र ऑनलाईन प्रदान करण्यात आले. त्यांनतर श्री.राजेश साबळे यांनी कविसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.प्रमुख पाहुणे म्हणून सौ.सरला मोते (संघटक) उपस्थित होत्या.

या कविसमेलनामध्ये सर्व  उपस्थित राज्यसमिती सदस्यांनी स्वलिखित रचना सादर केल्या.त्यामध्ये सावित्री दमकोंडवार ,गणेश पुंडे,सुरेशकुमार बोरकर, सीमा भांदर्गे,खं र माळवे ,सरला मोते,रजनी लुंगसे ,रणजित पवार आदींनी  दर्जेदार रचना सादर करून संविधान दिन खऱ्या अर्थाने साजरा करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.कविता काळे (राज्यसचिव) यांनी केले.आणि कार्यक्रम यशस्वी केला.

या प्रसंगी रणजित पवार यांनी संविधान उद्देशिकेचे अभिवाचन केले. आभार सुरेशकुमार बोरकर यांनी मानले तर अर्चना नेवकर(सहसचिव) यांनी गायिलेल्या माऊलीचे पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

आजच्या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच मनःपुर्वक आभार

चुकून कुणाचे नाव राहिल्यास क्षमा असावी.


शब्दांकन 

रणजित पवार

संस्थापक/कार्याध्यक्ष

संत गाडगे महाराज विचारमंच 

महाराष्ट्र राज्य.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या