संपुर्ण महाराष्टातून कवी कवयिञींच्या काव्यवाचनाने राज्यस्तरीय श्रावणी मैफलमध्ये भरला रंग-
जगतगुरु संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली)यांच्या संजिवनीसमाधीला ७२५ वर्ष पूर्ण होत आहे.त्यानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटक मा.युवाउद्योजक श्री अजित वडगांवकर (सचिव-ज्ञानेश्वर शिक्षण संस्था,आळंदी) उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले की,"महाराष्टात प्रथमच असा काव्यमैफलचा सोहळा ज्ञानेश्वर माऊली संजीवनी सोहळ्याला आनंददायक व काव्याची ऊर्जा देणारा सोहळा संपन्न झाला.महाराष्टातील सर्व जिल्ह्यातील आलेल्या कवी कवयिञी यांची मांदीयाळी भरली होती.पसादानातुन माऊलीने मांडलेल्या विचारांची चालना सदैव मिळत राहण्यासाठी अशा कार्यक्रमाची खुप गरज आहे.समाजाला आपण देण्याची भावना सदैव मनात असावी.त्यामुळे समाज विकोप बनण्यास मदत होते.भविष्यातील अशा उपक्रमाला आमच्या संस्थेच्यावतीने नेहमी सहकार्य मिळत राहील.कवी हा समाजाचा आरसा आहे."
या कार्यक्रमाचे अध्यक्ष-कविवर्य अभियंता श्री मैलारीराज कावळे (लातूर जिल्हा अध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच) यावेळी उपस्थित होते.आपल्या अध्यक्षीय भाषणांत म्हणाले की,"कवींना समाजाने जपले पाहीजे.श्रावणी काव्यमैफलमधील सादर झालेल्या रचना नव्या विचाराला चालना देणा-या आहेत.भविष्यातील काव्यक्षेञातील एक ध्रुव तारा म्हणुन नक्षञाचं देणं काव्यमंचकडे पाहीले जाईल.नवनिर्मीतीची ऊर्जा अशा काव्यमैफलमध्ये मिळत असते.भविष्यातील दर्जेदार कवी कवयिञी नक्की निर्माण होतील."
या कार्यक्रमाचे उदघाटक अजित वडगांवकर,कार्यक्रम अध्यक्ष कविवर्य अभियंता मैलारीराज कावळे,प्रमुख पाहुणे प्राचार्य दीपक मुंगसे,अॅ.प्रफुल्ल भुजबळ महाराज,सुरेश धोञेपाटील,गजानन दराडे,डाॅ.कैलास कदम,उद्योजक शंभूदादा पवार,समाजसेवक सुखदेव तात्या सोनवणे,तुषार सहाणे,प्रभाकर ढोमसे,अतुल नाणेकर,अॅड.संतोष काशिद,प्रा.प्रकाश कटारिया,रवी भोजणे, छाया ब्रम्हवंशी,सुभाष चव्हाण,प्रा.दिलीप गोरे,सीमा साळसकर.रामचंद्र पंडित,वंदना सुतार इ.अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघाटन पर्यावरण संदेश देत,वृक्षपूजन करुन,झाडाला पाणी घालुन व ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रतिमेस पूजन करुन करण्यात आले. यावेळी अनेक कवी कवयिञींनी आपली बहारदार रचना सादर करुन रसिकांची मने जिंकली. यावेळी अनेक पुरस्कार वितरण करण्यात आले,त्यातसमाजभूषण पुरस्कार मा.कविवर्य प्राचार्य दिपकजी मुंगसे,आळंदी,राजकवी डाॅ.ख.र.माळवे-मुंबई,कवी मो.शकील जाफरी-मंचर यांना प्रदान करण्यात आला.व दिवाळी अंक स्पर्धा मध्ये पुढील अंकानी यश संपादन केले.प्रथम-कुबेर-संगमनेर, द्वितीय-गंधाली-मुंबई, तृतीय-मनोकल्प-पुणे यांना स्मृतीचिन्ह,सन्मानपञ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच समाजसेवक सावळेराम रखमाजी डबडे कविरत्न पुरस्कार कविवर्य पियुष काळे,आळे यांना प्रदान करण्यात आला.कुसुमाग्रज स्मृती गौरव पुरस्कार-कविवर्या सौ.सुरेखा कटारिया,चिंचवड यांना बहाल करण्यात आला.
नक्षञ राज ज्योतिषरत्न पुरस्कार-परमपूज्य श्री अनंत घोष-मौनीबाबाजी-नारायणगाव,गौरव स्मृतीपुरस्कार-युवाउद्योजक श्री तुषार सहाणे-(विश्वस्त-श्री मार्तंड देवस्थान,जेजुरी), नक्षञ काव्यदौलत पुरस्कार-थांब ना रे ढगोबा-काव्यसंग्रह-कविवर्य राजेंद्र उगले,नाशिक यांना सन्मानित करण्यात आले.
नक्षञ गौरव पुरस्काराने कवी अॅड.जयराम तांबे- ओतूर,कवी गजानन दराडे.-जालना,कवी रामदास घुगंटकर-पुसद,कवी अनिल जाधव-दुबई,कविवर्या सौ.वैशाली बोरकर-नागपुर,कविवर्या सौ.किरणताई मोरे-गोंदिया,कवी परशुराम नेहे-ठाणे,कवी दिलीप विधाटे-मावळ, कविवर्या मंदाताई वाघमारे-यवतमाळ,कवी मोहन कुदळे-पिंपरी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी २२ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक-कविवर्या सौ.वृषाली वसंत टाकले-रत्नागिरी (मनभावन श्रावण),व्दितीय क्रमांक-कविवर्या प्रा.सुनंदा पाटील-ठाणे(श्रावण),तृतीय क्रमांक-कविवर्या सौ.सुरेखा रमेश काळे-सोलापुर(श्रावण),तसेच उत्तेजनार्थ १-कविवर्य सुनिल जाधव -सातारा (आला पाऊस पाऊस),उत्तेजनार्य २-कविवर्या सौ.सुमती पवार-नाशिक(श्रावण गुलाबी),उत्तेजनार्थ ३-कविवर्य सुरज अंगुले-उस्मानाबाद(निसर्ग संदेश) यांनी पटकावला.या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्टातुन ४६५ कविता आल्या होत्या.त्यातुन वरील कवी कवयिञींना बाजी मारली.त्यांना हि समारंभपुर्वक गौरविण्यात आले. हा कार्यक्रम शेठ नंदाराम कांतीलाल चोरडीया सभागृह,ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इमारत,आळंदी देवाची येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक कवी वादळकार,पुणे प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे राष्टीय अध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच,महाराष्ट व सर्व नक्षञ परिवार यांनी केले.तसेच संयोजनात प्रा.दिपक मुंगसे,रामदास हिंगे,मोहन कुदळे,बालाजी थोरात,संदीप नाईक,अतुल नाणेकर,विनायक विधाटे,साईराजे सोनवणे,गणेश सोनवणे,संतोष आवटी,प्रकाश कटारिया,जगदीश वनशिव,गुलाब नेहरे इ.अनेकांनी पुढाकार घेतला.तसेच ज्ञानेश्वर विद्यालयाचे सर्व कर्मचारी व स्टाप यांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.सहभागी कविंना सहभाग सन्मानपञ,गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले.कार्यक्रमाचे सूञसंचालन सौ.प्रीती सोनवणे,डाॅ.श्वेता राठोड यांनी बहारदार सूञसंचालन केले.आभारप्रर्दषण विकास राऊत यांनी मानले.सलग सहा तासांचा हा भव्यसोहळा संपन्न झाला.विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

0 टिप्पण्या