महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपाने काढला निषेध मोर्चा

 महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपाने काढला निषेध मोर्चा



डोंबिवली ( शंकर जाधव ) महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाढलेली राजकीय गुन्हेगारी ,महिला अत्याचार , शेतकऱ्यांवर कामगारांवर  होणारा अन्याय ,भ्रष्टाचार ,अमरावती  दंगलीचा निषेध करण्यासाठी आज भाजपाने कल्याण तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता .या मोर्चात भाजप आमदार रवींद्र चव्हाण ,माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यांसह अनेक कार्यकर्ते  सहभागी झाले होते.यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी  तहसील कार्यलयाबाहेर महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली .यावेळी आमदार  चव्हाण म्हणाले, महाविकास आघडीच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय ,स्पॉन्सर दंगल कशी घडवावी हे अमरावती मध्ये महाविकास आघाडी ने सिद्ध करून दाखवलं आहे , इतर राज्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले मात्र महाराष्ट्रमध्ये अद्याप दर कमी झाले नाही ,वीज बिल माफी नाही ,सरकारकडून सर्वसामान्य जनतेच्या हिताचं कोणतेही काम केले जात नसल्याचा  आरोप केला. 



बाईट -रवींद्र चव्हाण ( भाजप आमदार )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या