मनसे आमदार राजू पाटील यांचा पालिका प्रशासनाला प्रश्न..
कल्याण ( शंकर जाधव ) मंदिरावर केलेल्या कारवाईचा राग मनात धरून एका माजी नगरसेवकाने पालिका अधिकार्याला मारहाण केल्याची घटना कल्याण मधील 'अ' प्रभाग क्षेत्र कार्यलयात घडली . याप्रकरणी मारहाण करणाऱ्या माजी नगरसेवक विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. केडीएमसी कर्मचाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला असून भाजप आणि मनसेने मात्र माजी नगरसेवक मुकुंद कोट यांना पाठिंबा दिला .मनसे आमदार प्रमोद (राजू )पाटील यांनी कारवाई केलेल्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी सरकार आणि प्रशासन चालवणारे जे आहेत ते हिंदुत्व विसरलेत .स्व.हिंदूंहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आमच्या गावातील मंदिर तोडली.मात्र अनधिकृत बांधकाम होतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. या मंदिरावर कारवाईस विरोध करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल, केले जातात .त्या अधिकाऱ्याने गावाची माफी मागावी ,जिथे अनधिकृत बांधकाम सुरू आहेत तिथे कारवाई करायची नाही ,मंदिरावर कारवाई करत असाल तर उद्रेक होणार
अशी भूमिका मनसे आमदार राजु पाटील यांनी यावेळी स्पष्ट केली.
बाईट: प्रमोद ( राजू ) पाटील ( मनसे आमदार )

0 टिप्पण्या