जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचा विस्तार आता मुंबईबाहेरही...

 

मा. सचिन अहिर यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा युनिटची घोषणा



मुंबई, दि.१८ - मुंबईतील खाजगी अनुदानित/विनाअनुदानित प्राथमिक शाळांसाठी काम करणारी व ऑल इंडिया भारतीय कामगार सेना महासंघाला संलग्न असणारी जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेना ही अग्रगण्य समजली जाणारी संघटना आहे. दि.२० एप्रिल २०१८ रोजी अवघ्या १२५ सभासदांना सोबत घेऊन संघटनेची स्थापना मुंबईत झाली होती. त्यानंतर शिवसेना पक्षाच्या पाठिंब्यावर, भारतीय कामगार सेनेच्या सहकार्याने तसेच संघटनेचे प्रमुख सल्लागार मा. सुनिल राऊत साहेब, मा. जितेंद्र जानावळे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रबळ इच्छाछक्तीमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संघटनेने  अल्पावधीतच अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत आवाज उठवून ते पूर्णत्वासही नेले. त्यामुळे  संघटनेच्या अशा कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन मुंबईतील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघटनेचे सभासदत्व स्विकारले. आजमितीस संघटनेकडे सुमारे दीड हजार  सभासदांची नोंद आहे. विविध दै. वर्तमान पत्रे, सोशल मीडिया इ. माध्यमांद्वारे  संघटनेचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यात संघटनेला यश आले आहे.

       संघटनेच्या कार्याचा नावलौकिक पाहून रायगड जिल्ह्यातील काही शिक्षक बांधव संघटनेवर प्रेरित झाले होते व त्यांनी रायगड जिल्हा युनिट सुरू करण्याबाबतची इच्छा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.विजय पाटील यांच्याकडे मागील महिन्यात मांडली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारिणीत यावर चर्चा होऊन लवकरच रायगड जिल्हा युनिट सुरू व्हावे यावर एकमत झाले.

       त्यानंतर आजच भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस मा.सचिन अहिर साहेब व जय महाराष्ट्र संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या परेल येथील कार्यालयात रायगड जिल्हा युनिट पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन मा. सचिन अहिर साहेब यांच्या शुभहस्ते भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. तसेच मा. सचिन अहिर साहेब यांच्या उपस्थितीत जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेना - रायगड जिल्हा युनिट ची जल्लोषात अधिकृत घोषणा करून स्थापना करण्यात आली. तसेच  रायगड युनिटला शुभेच्छाही देण्यात आल्या. तसेच यावेळी मा. सचिन अहिर साहेब यांनी उपस्थित रायगड युनिट ला मार्गदर्शनही केले.

          लगेचच  संध्याकाळी संघटनेचे प्रमुख सल्लागार व शिवसेना आमदार मा.सुनिल राऊत साहेब यांच्या भांडुप येथील जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. मा.सुनिल राऊत साहेब यांनीही शुभेच्छा दिल्या आणि जोमाने काम करा मी तुमच्या सोबत आहे. असा धीरही दिला. 

       यावेळी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री.विजय पाटील, सरचिटणीस श्री.संदीप परब, कार्याध्यक्ष श्री.सुनिल सुर्वे, खजिनदार श्री.रामदास हंजनकर, कार्या. चिटणीस श्रीम. गीता राणे, उपाध्यक्ष श्रीम.स्मिता गाजूल, श्री. दिलीप घाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

      रायगड जिल्हा युनिटच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री.नरेश मोकाशी, सरचिटणीस श्री.बबन पाटील, उपाध्यक्ष श्री.रमनिक म्हात्रे, खजिनदार श्री.काशिनाथ म्हात्रे, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख श्री.निर्भय म्हात्रे, उरण तालुकाध्यक्ष श्री.बळीराम पाटील तसेच सल्लागार श्री.बाबुराव म्हात्रे व श्री. हिराचंद म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

      यावेळी संघटनेच्या वतीने मा. सचिन अहिर व मा. सुनिल राऊत यांचे आभार मानण्यात आले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या