"डोंबिवलीतील जी.एम. क्रिकेट क्लबचे खेळाडू म्हणजे जणू आंतरराष्ट्रीय क्रिकेटपट्टूच"
प्रतिनिधी : प्रविण बेटकर संपर्क - ९५९४४०१९२२
१४३ डोंबिवली (ठाणे)
गेल्या सलग चार दिवसांपासून डोंबिवलीतील जीएम क्रिकेट क्लबचे १० ते १४ वयोगटातील चुरशीचे सामने प्रेक्षकांना बघायला मिळाले.असंख्य प्रेक्षकांच्या मनात एक अभिमानास्पद आणि आदर्श या लहानग्या भावी जागतिक क्रिकेटपट्टूनी ठेवला आहे असे म्हणायला हरकत नाही. भविष्याची जाणीव देखील नसताना मात्र या पट्ट्यानि शिक्षणासोबत एक विश्वविक्रम रचण्याचे स्वप्न उराशी ठेऊन स्वतःच्या जीवाची अठ्ठापिठा करीत आहेत आणि याचे श्रेय हे चिमुगले आपले गुरू गोपाळ श्रीयान यांना देत आहेत. शेवटी हे पारंपारिक गुरू-शिष्याचे नातं म्हणायचं आणि आई-वडिलांचे संस्कार.! "गुरूने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा".. कारण या चिमुकल्या मुलाचं हुरहूरणार कोवळं मन, रंगबेरंगी स्वप्न आणि त्यांना सर्व प्रकारची संधी देऊन या कमी वयात त्यांच्या उज्जवल भविष्याकडे घेऊन जायचं महान कार्य हे फक्त गुरुच करू शकतात आणि असे एक गुरू जीएम क्रिकेट क्लबच्या माध्यमातून डोंबिवलीच नाव जगात उज्ज्वल करण्यासाठी लाभलेत हे सर्वांच भाग्यच आहे. GMPL-2021 या स्पर्धेत- जीएम वॉरियर्स ,जीएम लायन्स, जीएम बॉईज, जीएम इंडियन्स, जीएम ब्लूज, जीएम मास्टर्स, जीएम चॅम्प्स, जीएम रॉयल्स अश्या प्रकारच्या आठ संघांचा समावेश होता.या संपूर्ण सामन्यात सामनावीर/मॅन ऑफ द मॅच-।आदर्श शर्मा यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत २५ धावा करून उत्तम गोलंदाजीत ५ गडी बाद केले. तसेच या क्रिकेट स्पर्धेत १० वर्षांखालील संघातील विजेता पारितोषिक- जीएम बॉईज आणि उपविजेता- जीएम मास्टर्स यांनी पटकावले. सर्वोत्कृष्ट पदक फलंदाज-भाई क्रीवम, क्रिवम बंजन, गोलंदाज- मिलिंद,क्षेत्ररक्षक- संकल्प प्रजापती तर मेन ऑफ द मॅच- शौर्य नवले यांनी पटकावले. तसेच १२ वर्षांखालील संघात विजेता पारितोषिक- जीएम ब्लूज तर उपविजेता जीएम इंडियन्स असे होते तर सर्वोत्कृष्ट फलंदाज- ओम भाबल, गोलंदाज- प्रेम पाटील, क्षेत्ररक्षक- यश दळवी,
तसेच १४ वर्षावरील गटातील क्रिकेट संघात विजेता पारितोषिक- जीएम लायन्स, उपविजेता- जीएम वॉरियर्स यांनी बाजी मारली. सर्वोत्कृष्ट फलंदाज- वेदांग पटवर्धन, गोलंदाज- असीम म्हात्रे, क्षेत्ररक्षक- श्रेयस वनारसे, मॅन ऑफ द मॅच- अनमोल पांडे. या चार दिवशीय २०-२० क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय-ह.भ.प. गजानन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ, माजी सभापती मान.विकासजी म्हात्रे साहेबांच्या आशीर्वादाने, मान.विलासजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व मोलाच्या सहकार्याने घेण्यात आल्या. यावेळी अनेक मान्यवर, पालक व प्रेक्षकही बहुसंख्येने उपस्थित होते.आपल्या मुलांना प्रत्यक्ष खेळताना पाहून पालकांची मने देखील फुलांसारखी बहरलेली दिसत होती. अश्या प्रकारे अतिशय जल्लोशमय वातावरणात हे चुरशीचे सामने पार पडले.यावेळी अनेकांनी खेळाडूंना वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केले तर स्वतः जी.एम.क्रिकेट क्लबचे प्रशिक्षक-गोपाळ श्रीयान म्हणाले की, माझ्या खेळाडूंनी परिश्रम करून योग्य ते सहकार्य केल्यास मी वाटेल ते प्रयत्न करेन आणि माझ्या खेळाडूंचे आणि त्यांच्या पालकांचे नाव फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर अखंड जगात रोशन करण्याचे नक्की प्रयत्न करेन.प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत करीत कार्यक्रमाची सांगता झाली.

0 टिप्पण्या