पुरातन मंदिरांचे होणार सुशोभीकरण
मुंबई - चेंबूरमधील चेंबूर कॅम्प, कलेक्टर कॉलनी परिसरातील शिवशक्ती नगर येथे असणाऱ्या ५० वर्षे पुरातन शिव मंदिराचे सुशोभीकरण शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या विशेष प्रयत्नातून केले जाणार आहे.या कामाचा शुभारंभ नुकताच आमदार फातर्पेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
पालिकेच्या प्रभाग क्रमांक १५४ मधील शिवशक्ती नगरातील हे प्रसिद्ध शिवमंदिर जणू इथल्या स्थानिक नागरिकांचे कुलदैवतच बनले आहे.
मंदिराचे दर्शन घेऊनच अनेकजण या शिवशक्ती नगरात प्रवेश करतात.अशा या पवित्र मंदिराच्या डागडुजीचे आणि सुशोभीकरणाचे काम आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या फंडातून केले जाणार आहे.आमदार फातर्पेकर यांनी आतापर्यंत आपल्या मतदारसंघातील अनेक पुरातन मंदिरांना उजाळा देण्याचे,त्यांच्या पुनर्बांधणीचे काम केले आहे.तसेच अन्य विकासकामाचाही गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जणू सपाटाच लावला आहे .
या मंदिराच्या सुशोभीकरण शुभारंभ कार्यक्रमावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या