लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशन च्या वतीने "मृदगंध" पुरस्कार जाहीर.. दि.26 नोव्हेंबर रोजी पुरस्काराचे वितरण..
मुंबई (प्रतिनिधी) लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह निमित्त विठ्ठल उमप फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी मृदगंध" पुरस्कार सामाजिक, साहित्यिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक ,संगीत ,लोककला, आदी क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना देणार असून शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी ४.३०वा. रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई येथे सन 2020 व 2021 या दोन वर्षाच्या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष नंदेश विठ्ठल उमप यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सन 2020 च्या" मृदगंध" पुरस्कारासाठी श्रीमती माया जाधव यांना जीवनगौरव लेखक व साहित्यिक प्रेमानंद गज्वी, अभिनेता व निर्माता प्रशांत दामले ,संगीतकार अशोक वायंगणकर, सामाजिक सेवा रवींद्र भिलारी नवोन्मेश प्रतिभा कुमारी प्राजक्ता कोळी तर 2021 चे पुरस्कार जयंत सावरकर यांना जीवनगौरव साहित्यिक व लेखिका डॉक्टर विजया वाड, सामाजिक सेवा ना. राजेश टोपे (आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य ) संगीत सेवा श्रीमती उत्तरा केळकर ,लोककला सत्यपाल महाराज चिंचोळकर नवोन्मेश प्रतिभा ओम राऊत आदींची निवड करण्यात आली असून संगीत समारोह चे पहिले पुष्प श्री महेश काळे व सत्यपाल महाराज प्रबोधनात्मक भजन सादर करणार असून सर्वांनी कार्यक्रमाला हजर राहण्याचे आव्हान नंदेश उमप यांनी केले आहे

0 टिप्पण्या