विठ्ठलवाडी डेपोत शिळी भाकरी आणि ठेचा खात २८२ कर्मचाऱ्यांनी शिळी भाकरी आणि ठेचा खाऊन केले आंदोलन....
डोंबिवली ( शंकर जाधव ) गेल्या आठ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत.परिवहन मंत्री अनिल परब यांनी कृती समिती नेमल्याचे सांगत योग्य ठिकाणी मागण्या मांडा असे सांगितले. मात्र जोवर मागण्या मान्य होत नाही तोवर संप मागे घेणार नाही असं पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.कल्याण जवळील विठ्ठलवाडी एसटी डेपोत २८२ कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.गुरूवारी दुपारी येथील कर्मचाऱ्यांनी डेपोत शिळी भाकरी आणि ठेचा खात २८२ कर्मचाऱ्यांनी शिळी भाकरी आणि ठेचा खाऊन अनोखे आंदोलन केले. सरकारच्या कृती समितीवर विश्वास नसल्याचे यावेळी वाहक योगेंद्र कदम यांनी सांगितले.आमच्या नशिबी शिळी भक्ती आणि ठेचाच का? असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला. तर आपल्या मागण्यांसाठी मराठी माणसाला वारंवार रस्त्यावर उतरावं लागत ही खंत देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. तर याप्रसंगी महिला कर्मचारी भावुक झाल्या होत्या.

0 टिप्पण्या