श्रीमती सीताबाई भिकू नर मौज-वारगांव यांचा टपाल खात्याने केला सन्मान.

 


श्रीमती सीताबाई भिकू नर मौज-वारगांव यांचा टपाल खात्याने केला सन्मान.         मुंबई - श्रीमती सीताबाई भिकू नर ह्या मौजे-वारगांव ता. कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे गेली ८७ वर्षे राहात असून अद्याप पर्यंत पूर्वापार असलेली शेती, फळबागा इत्यादी सांभाळत असताना आजही त्या शेती करण्यासाठी स्वतः जात आहेत.मुलाबाळांप्रमाणे गुरेढोरे यांचे पालनपोषण करणे ही त्यांची आवड आजही त्या जोपासत आहेत.खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या शेती परवडत नसताना ही केवळ पूर्वापार आपली संस्कृती आणि संस्कार यांचे जतन झाले पाहिजे व पुढील पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणून त्यांचा हे सर्व सांभाळण्याचा प्रेमळ हट्ट असतो.त्यांचा मोठा मुलगा अनंत (बाळा) नर शिवसेना नगरसेवक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहे.तर प्रकाश (बापू) भिकू नर मौजे-वारगांव येथे सरपंच म्हणून चांगले काम करत आहे.तसेच जयवंत नर स्वतःचा व्यवसाय करत आहेत.संपुर्ण परिवाराला प्रामाणिकपणा व विनम्रतेचे संस्कार देणाऱ्या श्रीमती सीताबाई भिकू नर यांचा दादर पोस्ट कार्यालयात सत्कार करण्यात आला.अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दादर पूर्व कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा करण्यात आला.दिनांक ११/१०/२०२१ पर्यंत विविध कार्यक्रम राबवून टपाल खात्याच्या विविध योजना व उपक्रम जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कार्यालयाचे प्रमुख (पोस्ट मास्टर) सुभाष परब, अधिक्षक बाबासाहेब पाठारे, जनसंपर्क प्रमुख सुतार, अधिकारी बाळा चौकेकर व मंगेश शेट्ये आणि सहकाऱ्यांनी केला.प्रत्येक दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन करून टपाल खात्यातील कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचा सन्मान तसेच समाजातील गुणवंत, कर्तुत्ववान व्यक्तींचाही सन्मान यामध्ये करण्यात आला.दिनांक १६/१०/२०२१ रोजी प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये आमदार कालिदास कोळंबकर, श्रीमती सीताबाई भिकू नर, शिवसेना नगरसेवक प्रमिला पांचाळ, पत्रकार नंदकुमार पाटील, कलादिग्दर्शक चंद्रशेखर यांचा पोष्टाचे तिकीट (त्यांचेच छायाचित्र असलेले) सन्मानचिन्ह व तुळशीचे रोप आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी शिवसेना नगरसेवक व सुधार समिती सदस्य अनंत (बाळा) नर, दादर टपाल कार्यालयाचे अधिक्षक बाबासाहेब पाठारे, टपाल कार्यालयाचे प्रमुख (पोस्ट मास्टर) सुभाष परब, सुतार, मंगेश शेट्ये, सुधाकर नर, जयवंत नर, अनुसया नारकर, शैलेश बांदेलकर, शिरीष चव्हाण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या