अन्यथा नाशिकचे विभागीय आयुक्त यांचे दालनासमोर आंदोलनाचा शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचा इशारा...!!!

 साकुर पठार भागातील खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्ती संदर्भात निर्णय न घेणाऱ्या संबंधित कार्यकारी अभियंत्यांवर निलंबनाची कार्यवाही व्हावी, अन्यथा नाशिकचे विभागीय आयुक्त यांचे दालनासमोर आंदोलनाचा शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचा इशारा...!!!

 




निकृष्ट दर्जाचे काम व खड्डेमय रस्त्यांबाबत पाठपुरावा, खड्डेमय रस्त्यात वृक्षलागवड आंदोलन करून देखील संबंधित कार्यकारी अभियंता कुठलीही दखल घेत नाहीत त्यामुळे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जि.प.सा.बा.उपविभाग संगमनेर यांचे निलंबन करण्यात येऊन, साकुर पठारभागातील तमाम जनतेचा खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्यात यावा.


साकुर पठार भागातील बहुतांश रस्ते हे खड्डेमय झाले असून अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. शेतकऱ्यांना मालवाहतूक करण्यासाठी खुप अडचणी निर्माण होत आहेत.


 त्यामध्ये मुख्यत्वे   जि.प.सा.बा.विभाग-   १.रणखांब फाटा ते दरेवाडी,  २.साकुर ते बिरेवाडी फाटा (५ किमी) सार्वजनिक बांधकाम विभाग-  १.साकुर ते नांदुरखंदरमाळ जांबुत मार्गे,  २.मांडवे बुद्रुक ते वरवंडी खड्डेमय झालेल्या रस्त्यांवर दि २७/०९/२०२१ रोजी व्रुक्षलागवड करून आंदोलन करण्यात आले.  निकृष्ट दर्जाचे काम व खड्डेमय रस्त्यांबाबत पाठपुरावा, आंदोलन करून देखील संबंधित कार्यकारी अभियंता कुठलीही दखल घेत नाहीत. तसेच संबंधित कार्यकारी अभियंता तसेच दोषी असणारे अधिकारी यांचे निलंबन करण्यात यावे. सदर निवेदनावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास मा.विभागीय आयुक्त नाशिक यांचे कार्यालयासमोर तमाम साकुर पठार भागातील नागरिकांसह आंदोलन करण्यात येईल.

असा इशारा  शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष, शिवश्री राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी दिला आहे.

सदर निवेदन जिल्हा परिषद अ.नगर चे मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र क्षीरसागर, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर तसेच  

मा. भगतसिंग कोश्यारीसाहेब,राज्यपाल, महाराष्ट्र राज्य  

मा. विभागीय आयुक्त साहेब, नाशिक

मा. ना.उद्धवजी ठाकरेसाहेब,मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य  

मा. ना. अशोकजी चव्हाण साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य

मा.ना.बाळासाहेबजी थोरात साहेब, महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य 

मा.खा.सदाशिव लोखंडे साहेब, शिर्डी लोकसभा यांना दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या