चेंबूरच्या घाटले गावच्या संत गाडगे महाराज एसआरए सोसायटीच्या
व्यायाम शाळेचे उद्घाटन
चेंबूर- चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील संत गाडगे महाराज एस. आर. ए. गृहनिर्माण संस्था येथे अद्ययावत व्यायाम शाळा व खास महिलांसाठी बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आणि स्थानिक लोकप्रिय नगसेवक अनिल पाटणकर यांनी स्वखर्चाने दिलेल्या ट्रेडमिल व सायकलचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी ज्येष्ठ नेते जगदीश पराडकर,शिवसेनेचे चेंबूर विधानसभा संघटक अविनाश राणे,वार्ड क्रमांक १५३ चे शिवसेना शाखाप्रमुख उमेश करकेरा, शिवसेना महिला शाखा संघटीका अनिता महाडिक, मिनाक्षी पाटणकर, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये, शिवसेना महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.नगसेवक पाटणकर यांनी खास महिलांसाठी केलेल्या या मदतीबद्दल या गृहनिर्माण संस्थेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानले.

0 टिप्पण्या