दुकानदाराने शिवीगाळ केल्याचा आरोप करत तृतीयपथीयांचे
दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन
कल्याण ( शंकर जाधव ) दसऱ्याच्या मुहूर्तवर नव्या दुकानाचे उदघाटन करताच तृतीय पंथी या दुकानात गर्दी करत पैशाची मागणी करतात मात्र काही वेळा काही दुकानदार यांना पैसे देतात तर काही दुकानदार यांना दुकानातून हाकलून देतात अशाच प्रकारे कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक ते सदानंद चौक च मध्ये असलेल्या अमृत नावाच्या दुकानाचे उद्घाटन झाले. यावेळेस काही तृतीयपंथी या दुकानांमध्ये पैसे मागण्यास गेले मात्र दुकानदाराने या तृतीयपंथीयांना शिवीगाळ करत दुकानाच्या बाहेर धक्काबुक्की करत काढल्याने संतप्त तृतीयपंथीयांनी धक्काबुक्की करणाऱ्या माफी मागावी असे सांगत दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. तब्बल दोन तासाच्या ठिय्या आंदोलन नंतर पोलिसांची मध्यस्थी झाल्यावर दुकान मालकाने या तृतीयपंथी कडं माफी मागितल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

0 टिप्पण्या