मुंबई - माजी केंद्रीय मंत्री, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत,शिवसेना उपनेते, पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व आमदार यामिनी जाधव यांच्या सूचनेनुसार तसेच स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्या नगरसेवक निधीतून व शिवसेना माजीनगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या विशेष प्रयत्नाने प्रभाग क्रमांक २१० येथील कै. हरिभाऊ वडगावकर चौकाचे सुशोभीकरण करून "दहीहंडीची पंढरी, माझगाव ताडवाडी" हे साकारण्यात आले आहे.
या सुशोभित चौकाचे लोकार्पण आणि उदघाटन आमदार यामिनी जाधव यांच्या शुभहस्ते आणि मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव,नगरसेविका सोनम जामसुतकर व शिवसेना माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सुर्यकांत पाटील, विधानसभा समन्वयक बबन गावकर,विधानसभा संघटक विजय लिपारे,विधानसभा संघटिका चंदना साळुंखे, उपविभागप्रमुख विजय कामतेकर,शाखाप्रमुख हेमंत मयेकर,शाखा संघटक मेघा भोईर,उपशाखा संघटक विद्या राबडिया,माजी शाखाप्रमुख गणेश पाटील, उपशाखा संघटक मेघा चेंदवणकर, युवती अधिकारी श्रद्धा वाघमारे, उपशाखाप्रमुख रॉनी बगवाडिया,जेठालाल राठोड,जगदीश नलावडे, ग्राहक कक्ष अधिकारी देविदास माडीये आणि माझगाव ताडवाडी येथिल स्थानिक सर्व रहिवाशी मोठया संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या