भाग ३ 

            .की, माझा आनंदाला सीमा नाहीत.आईला मिठी मारत आभार व्यक्त केले.

            जया वहीणी म्हणाल्या, ताई तुम्हांला येवढा उशीर कसा झाला घरी परतायला

            मनू म्हणाली, वहीणी मी त्यांना रिक्षा बसू दिले नाही.येथून त्यांचा हात माझ्या हातात घालून पायी रमत गमत निघालो, कितेक वर्षातुन त्यांच्या सोबत हातात हात घालून मुक्तपणे संचार केला मी, खूप बरे वाटले जीवनाचे सार्थक झाले अणूभव मिळाला त्यांना तर सोडवेच वाटेना पण त्यांनी मला मी पुन्हा येईल असे आश्वासन दिले. बघ ना वहीणी त्यांचा मोबाईल नंबर सुध्दा दिला मला माझ्याही मोबाइल नंबर घेतला त्यांनी ते एक दिवस येतील माझ्या कडे कायमचाच.

            सरीताबाई कडून राहीले गेले नाही त्यांनी लगेच मनूला प्रश्न केला तो कसा येईल ?

            मनू म्हणाली, आई मी त्यांच्या गडयात फास टाकला आहे.तो किती आवडला जातो ते बघायचे आहे. आई तुने चांगली शक्कल लढवली त्यांना आपल्या घरी बोलावून, खरेच खुपचं बरे केले हेच आगोदर केले असते तर.

            सरीताबाई मोठ्या दु:खत स्वरात म्हणाल्या, बाई असे काही करु नको, त्याला फास लागेल असे.चांगला मुलगा आहे तो. तो तुझ्यावर खुप प्रेम करतो, मी बघत आली आहे.

            जया वहीणी म्हणाल्या, मग आई ते ताईंना का म्हणाले, मनू आता खुप उशीर झाला म्हणून.

            सरीताबाई आपल्या आवाजात प्रेम भावना निर्माण करत म्हणाल्या, पोरी तो कितेक वर्षे मनूसाठी येत राहीला त्याला वाटले यांच्यात काहीतरी बदल घडेल आणि हे मनूला त्याच्याकडे पाठवतील पण थेरडयाने मेला तरी चांगले पुण्याचे काम केले नाही. मेला तर मेला माझ्या लेकीच्या आयुष्याची राखरांगोळी करुन मेला, नरकात जाईल थेरडा, माझा शाॅप आहे.

            मनू म्हणाली, आई जावू दे ना, बाबांना कशाला दोष देते त्यांना तसे वाटले ते कट्टर हिंदुत्ववादी होते.त्याच्या मुलीने एका हालक्या जातींच्या मुलांबरोबर लग्न करून संसार करावा त्यांना नाही आवडायचे बस येवढेच.

            सरीताबाई रागातच म्हणाल्या, मोठा पुडका बापाचा, तुझ्या आयुष्याचे मातेरे केले जीवनाची, संसाराची राखरांगोळी करुन मेला त्याचे काहीच , 'नकटीच्या लग्नाला सत्तासे साठ विघ्ने'. 

            जया वहीणी म्हणाल्या, जावूदया आई, पण ताई काय म्हणाले तुमचे महाशय, भटू भावजी.

            मनू म्हणाली, वहीणी असे खास काही नाही पण तो फास त्यांच्या गडयात फिट बसला ना तर तो मला विसरणार नाही. हे मात्र तितकेच खरे आहे.

            सरीताबाई कडून राहीले गेले नाही त्या म्हणाल्या, असे काय केले जुने तर र् तो तुला घेवून जाईल. किंवा तुझ्या कडे येवून राहील. कसा ?

            मनू म्हणाली, आई तु काळजी करु नको मी त्यांना एकटयाना सोडले होते तेव्हा अधूनमधून त्यांना भेटायला तुम्हाला नकळवता जात असे तेंव्हा हा भटू माझ्या गैर हजरीत एक संजना नावांची मुलगी आमच्या घरात यांच्या सोबत राहातं असे, दोन तिन वेळा मी तिला यांच्या सोबत बघीतले तेव्हा मी त्याच्याकडे जास्तीत लक्ष दिले नाही कारण मी कुठे त्यांच्या जवळ राहातं होते. त्यांच्या शरीर धर्मासाठी तिचा उपयोग करुन घेत असतं मी त्यांना या विषयी भाडली सूध्दा होते. पण ज्यास्त त्रास दिला नाही.मग मी त्यांना. हे जेव्हा त्यांना बोलले तेव्हा फक्त बघत राहीले काहीच बोलेले नाही मी येतो ग मनू म्हणाला.

            सरीताबाई म्हणाल्या, मला सांग तुम्ही एकत्र होतात रुम मध्ये काही घडले का ?

            मनू म्हणाली, नाही ग आई , ते पहील्या सारखे राहीले नाहीत. बरीच लगट केली मी पण त्यांच्या फत्तरला पान्हा फुटला नाही. मी त्यांना उसाह निर्माण व्हावा म्हणून किती तरी चुंबने घेतली काय नाही केले संपुर्ण शरीर त्यांच्यावर झोकुन दिले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.जबरदस्ती केली तरी त्यांनी बाजूला सारले.येरवी स्वतः:हुंन लगट करणारा भटू मनू त्यांच्या जवळ असून तिचा सहवास हवा हवा वाटणारी देखील त्यांनी हात लावला नाही उलट मी माझा डाव साधण्यासाठी प्रर्यास करत होती. पटकन मनूच्या लक्षात आले आईने त्यांना मुद्दाम आराम करायला सांगितले होते. मनूने आई म्हणत डोक्यावर हात ठेवला.

            किती मतलबी बनली ती, तिने मला घरात घेतले माझ्या मनात वासना उपलब्ध व्हावी म्हणून  कुशीत शिरली तिच्या मांडीवर माझे डोके ठेवून माझ्या केसातून हात फिरवत मला कुरवाळत नवं नवं योजना मनात आखीत होती. का कुणास ठाऊक माझे मन येवढे निष्ठूर झाले होते.एके काळी तिचा सहवासासाठी कासाविसा व्हायचो ती जरी माझ्या नजरे आड झाली तर मन बेचैन व्हायचे तिला याच घरात शोधत असायचो. मग आज माझे मन का येवढे कठोर झाले होते पण मी चूकलो का ? का मग बरोबर वागलो. असे करायला नको होते तिचे मन मोडायला नको होते. 

            मनूने मला संजनाची आठवण करून दिली, काय होते तिचे या मागचे म्हणणे, काय कारण होते.जुण्या आठवणीना उजाळा देयायचा, दडलेले मुडदे खोदून काढण्याचा वारुळात जशा मुंग्या ये-या जा-या घालतात तसेच विचार मनात झिमा फुगडी खेळत होते. आणि मी आपल्या घराकडे ओळला जात होतो. 

            मी घरी आलो होतो. मनात अनेक प्रशनाचे आभाड माझ्यावर कोसळले होते. काय करावे कसे करावे मला समजले नाही पण असाही प्रसंग माझ्या वाट्याला घालून येईल स्वप्नात देखील विचार केला नसेल.

            माझी योगी या गोष्टींपासून कोसो दूर होती.तिला या तिच्या नवऱ्याच्या गत आयुष्याबद्दल तिळ मात्र खबर नसल्याने भटू घरात आल्या आल्या म्हणाली, आज तर सुट्टी नव्हती तरी येवढा लवकर घरी आले काम नव्ह्ते का ? का मग तब्बेत बरोबर नाही.

            मी म्हणालो,काम थोडेच होते म्हणून निघून आलो. लवकर घरी यायला नको का ?

            योगी म्हणाली, हो तसं काही नाही लवकर आले म्हणून सहज विचारले.

            घरी तर आलो होतो पण माझे मन मात्र ठिकाणा वर नव्हते. ते मनूकडे फिरक्या घेत होते. मला संजनाची आठवण करून द्यावी, या मागे असलेले तिचा हेतु समजला नाही. म्हणजे काय असावे कळत नाही. काय म्हणायचे आहे तिला. डोक्याला हात लावीत मी विचार करुन प्रसंग आठवला, तर संजना डोळ्यापुढे दिसत असे त्या दिवशीचा प्रसंग आठवला घरी आलो होतो. आणि संजना त्या दिवशी माझ्याकडे मुक्कामाला थांबत होती. सकाळचे म्हणजे पहाटेचे चार ते साडेचार वाजले असतील आणि माझ्या घरचा दरवाजावर थाप पडली भटू,भटू द्वारासमोर खोल द्वारा समोर  मनू हुभी होती. रिक्षात काही सामान होते. आणि ती पावसाने ओलेचिंब झाली होती. मी मात्र सकाळच्या साखर झोपेत होतो. कोन बाहेर दरवाजा वाजता आहे कानी पडले, आणि संजना म्हणाली, कोणी तरी द्वार बाजवत आहे. मी बघतो म्हणालो, संजना ने नुसते हुं करत आता कोन आले असणार उगाच झोपेचं खोबरे करायला जा बघू कोन आहे. संजना तशीच झोपली पण आवाज जोरात आल्यामुळे ती म्हणाली,बघ बघ कोण आहे ते लहान मुले वैगरे असतील भैवतेक

            मी दार उघडले होते. बघतो तर काय मनू माझा विश्वास बसेना डोळे चोळीत  म्हणालो, अशी कशी चूकली स्वारी आज इकडे.

            मनू म्हणाली, भटू बघतोस काय ते सामान घे बघू रिक्षातून.

            मी म्हणालो, घेतो,घेतो तु आत ये बघू .

            मनू म्हणाली, येवढी बाहेर बोबा मारते आणि तु हे तर झोपलास घोडे विकून.

            आम्ही दोघे घरात शिरलो होतो.मनात नाना प्रकारच्या प्रश्न एक मेकांना आदळत होते.आता काय होणार घरात संजना आहे.हिने बघीतले तर घरात  महाभारत, रामायण,घडणार .

            मनू जम्मुहुन आल्यामुळे खूपच थकली होती. म्हणाली भटू थोडी चहा ठेवते तू घेणार, 

            मी म्हणालो तू थकली असील  आता प्रवासातून आली आहेस, रेल्वे तुला झोप पण आली नसेल मी मांडतो चहा तू बस. 

            मनू म्हणाली, किती ग बाई माझा नवरा समजदार, शहाणा लाडाचा, जरा गोड बनव  आणि हो मी रेल्वेने नाही विमानाने आले आहे. तुझ्यासोबत दोन दिवस राहता येईल म्हणून

            मी म्हणालो, हो, गोड, गोड साखर जास्त घालतो, बरे केली विमानाने आलीस तर. दोघांचा चहा झाला होता. चहाचा कप मी ठेवायला जाणार तेवढ्यात 

            मनू म्हणाली, भटू राहू दे, मी ठेवते मला जरा फ्रेश व्हायचं आहे. ठेवते मी माझे मन चिलबिच झाले आणि एक आग निर्माण होईल असे वाटत होते.तरी मी माझे मन घट्ट करून घेते होते. जरा धिराईने घेतले कुठून, कुठून आनले होते ते बळ मी कळत नाही. कळत नाही.

            मनु फ्रेश होऊन बेडरूम मध्ये आपले कपडे बदल ने करता शिरली तर बेडवर कुणीतरी झोपलेले बघितले तिला वाटले कुणीतरी पाहुना आला असेल झोपला असेल 

            मनू म्हणाली भटू कोण पाहुणे आले आहेत. आपल्याकडे.

            मी मनोमन घाबरलो आता माझे सारेच बिंब फुटणार मनूला सारी हकीकत समजणार तर गोंधळ चालेल आता माझे काय होणार असे मी एवढे म्हणालो, होय पाहुणे  आले आहेत.

            मनू म्हणाली,कोन आहेत.कुणी गावाकडून आले आहेत का ?

            मी भित भित उत्तर दिले संजना.

            मनू म्हणाली,काय संजना जोरात ओरडली, संजना हो, मी तेच म्हणत होते.तुला द्वार हुगडायला उशीर का झाला.तिला धरुन लोंबत असील ना मज्जा आहे बुवा तुझी, बायको सोबत नाही म्हणून तिचा गैरफायदा घेतोस वा रे वा.

           मी काहीच बोललो नाही. कसा बोलणार, बोलणार तर वाद-विवाद होऊन ते भांडणात रुपांतर होणार अधी असे झाले होते. भाडभाड भाधले होती संजनाशी पण मी  काहीच बोललो नाही. तसाच आज गप्प होतो. मनू मात्र बेडरूम मध्ये गेली.

           मन म्हणाली,ये उठ ग, काय पडलीस घोडी सारखे मला पडायचा आहे. आग टाकायचे आहे.

           संजना डोळे चोळीत हुं हुं करत भटू झोपू देना, सकाळ कुठे झाली. असही तु कुठे रात्रभर झोपू दिलस.

           मनू म्हणाली,थोडी रागवतच उठ,उठा बाईसाहेब तुमची डिवटी संपली आहे.

           संजना उठली मनूला बघताच एकदम दचकली आ आ करत तुम्ही कधी आल्या.

           मनू म्हणाली, येवून बराच वेळ झाला. थकली आहे जरा पडायचे म्हणते. पण तु काळजी घेतेस ना, का माझ्या नव-याच्या गडयात पडायचे आहे. असे नको करु हो, आता सध्या सामावून घेते नंतर नको, तु जा हाॅल मध्ये, स्वारी. 

           संजनाला हॉल मध्ये येताना बघीतले मी हैराण झालो काय काहीच घडले नाही. मनू काहीच कशी बोलली नाही.मी तसाच बेडरूम मध्ये गेलो आणि मनूला म्हणालो, मनू काही हवे आहे का.

           मनू म्हणाली,नको,नको काही नको फक्त बेडरूमचे दार बंद कर.

           मी बेडरूमचे दार बंद केले पण मी बेडरूम मध्ये न जाता बाहेर हॉलमध्ये आलो दार बंद झाल्यावर मनूने आवाज दिला जरा पंखा वाढव बघू मी बेडरूम घ्या बाहेर होतो आवाज कसा येणार तिने परत आवाज दिला भटू लाईट घालव बघू लाईटचा प्रकाश पडत होता. ति स्वतःशीच म्हणाली, माझा आवाज पोचला नसेल भैवतेक असे म्हण उठली बघतेस तर काय मी बेडरूम मध्ये नाही ती तशीच तनफन करत उठली बेडरुमचे दार खोलते मी कुठे आहे. मी मात्र दोघी हात डोक्याला लावून खुर्चीत बसलो होतो.

           मनू म्हणाली, भटू येथे काय करतोस मी तुला बेडरुमचे दार आतुन बंद करायला सांगितले बाहेरुन नव्हे, चल बघू.

           मी म्हणालो, तु चल मी आलोच पण तिने माझा हात हातात घेत बेडरूम मध्ये नेले संजना माझ्याकडे बघत राहीली. मात्र बेडरूम मध्ये गेल्या,गेल्या मनू माझ्या कुशीत कधी शिरली ते मला कळलेच नाही. 

         लेखक:-भटू हरचंद जगदेव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या