कथा -
भाग २
मी कोन ?
मोबाईलची रिंग वाजली मी मनोमन म्हणालो,कुणी फोन केला असावा.फोनकडे बघत नंबर तर अन् ओळखी होता.मोबाईल रिशिव करत म्हणालो,हलो हलो कोन !
समोरुन बाईचा आवाज ऐकाला आला आणि त्या म्हणाल्या, कसा आहेस बेटा.या बोलण्यात काळजीचा,आपूलकीचा स्वर होतो. मी सरीता बोलतेय.
मी ताबडतोब आवाज ओळखला आणी फोनवरुन बोलत असलेल्या सरीताबाईना तेवढ्याच नम्रतेने म्हणालो,आई बोलाना कशा आहेत सारे ठिक तर आहे ना ? आपली तब्येत बरी आहे ना, आणी प्रकाश दादा व वहिनी कसे आहेत मज्जेत ना,
सरीताबाई म्हणाल्या, हो हो सर्वच जन ठिक आहेत. जरा मला बोलू देतोस का ? तु कसा आहेस बरा आहेस ना आणी कुठे आहेस मुंबईत का मग गावाकडे
मी म्हणालो,आई मी मजेत आहे.कशी काय आठवन झाली माझी .
सरीताबाई म्हणाल्या, तुला भेटायचे होते.उदया येतोस घरी.
मी म्हणालो , आई उद्या,
सरीताबाई म्हणाल्या, होय उदया.
मी म्हणालो, आई उद्या नको, परवा आलोतर चालेल का ? मला जरा महत्वाचे काम आहे. फोन ठेवला
सरीताबाईच्या जीवात जीव आला होता मनाला बरे वाटले होते.त्यांना मला भेटून काय असे झाले तुझ्यात आणी मनू मध्ये त्यांनी जाणून घ्यायचे होते. आम्हा दोघांना मधे असे काय बिघडले ते जाणून घेवून सावरायचे होते.
माझ्या अंतस्थ मनाच्या गाभाऱ्याची तगमग सुरु झाली होती. विचारांचे सांगड चक्र चालू झाले होते. स्वतःशीच म्हणालो,आईने काय म्हणून बोलावले असे बरे सर्वकाही ठिक तर असेल ना, घरी का मग मनूने काही गोंधळ वैगरे घातला नसेल ना असे बरे वाईट विचार मनाला शिवले.तर्क-वितर्क विचार करुन अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत होतो. पण माझे माझे आंतरीक मन सुखावले होते. गेले १० ते १२ वर्षाने सासूबाईचा मला फोन आला होता.माझी त्यांनी आपुलकीने विचारपूस केली होती. येरवी बिजूशेठ असले तर बोलायची हिंमत होत नसे.
मी मोठया हिम्मतीने भांडुपच्या रेल्वे स्टेशन वर पोचलो होतो.पण मनात अनेक विचार येत जात होते.माझे चिंत मला निटसा विचार घेवू देत नव्हते. लगेच मनात विचार पालटला जावू का नको भांडुपला मनाच्या गाभाऱ्याची स्थिती बिकट झाली होती.स्टेशन पर्यंत पोचलो तर होतो.पण मनात घोळत असलेल्या माराला कसे तरी दाबले आणी माझे पाय पुढे पुढे चालू लागलो रिक्षा मध्ये कसा तरी नाही हो करत बसलो आणी रिक्षा चालू लागली नाडकर्णी निवासाच्या दिशेने.
रिक्षा नाळकर्णी निवासा जवळ येवून थांबली, तरी माझ्या मनाची एकाग्रता भंग पावत होती वाटत होते की,असाच येथून परत जावे असेच वाटत होते पण कसे तरी
कसा तरी मनात हिंमत बांधत नाळकर्णीच्या आलीशान जुण्या वाड्याकडे बघीतले आणि मागेची बारा तेरा वर्षापूर्वीची गोष्ट आठवली तसा या वाड्यात कितेक वेळा येवून गेलो होतो. बरेच वेळा मी या वाड्यात वस्तीला थांबलो होतो.तेव्हा मला कसलाच संकोच वाटत नसायचा पण आता माझे बाय पुढे जाणायला धजत नव्हते.रिक्षाचे भाडे देत आजूबाजूला कुणी आहे का याची चाचपणी करत होतो पण मला तेथे कुणीच दिसले नाही.मात्र कम्पाउड जवळ येताच कुत्रा भुकण्याचा आवाज आला भैवतेक कुत्र्याला माझी चाहुल लागली असावी. तसा मी त्या आवाजाने दचकलो पण मी कुत्र्याला चांगल्या प्रकारे ओळखत होतो.कुत्र्याचा भुटण्याचा आवाज ऐकून सरीता बाईंनी कानोसा घेतला आणि त्या घराच्या आवारात आल्या मला बघताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले होते. कुत्र्याला हळ म्हणत त्या लगबगीने माझ्याकडे आल्या आणी म्हणाल्या, भटू ये बघू .
मी थोडा पुढे सरकत थोडासा वाकुन त्यांच्या पायाला हात लावत म्हणालो,आई नमस्कार करतो.
सरीताबाई म्हणाल्या, तुझी सवय खरोखर गेली नाही राहुदे बेटा,चल घरात. त्यांनी घरातल्या सदस्यांना आवाज दिला आ रे बघा कोन आले आपल्या घरी. घरातुन प्रकाश दादा लगबगीने आले आणी माझी विचार पुस केली.लगेच त्यांच्या पत्नी आल्या बघतात तर काय चक्क भटू मी त्याच्या घरी चालत आल्याने त्या भावूक झाल्या होत्या मी त्यांना स्मित हास्य करुन हलो केले त्याही गालातल्या गालात हसत मला हलो केले आणी मनातल्या मनात म्हणाल्या हेच ते ताईचे महाशय.
मी सर्वांशी हाय हलो करत एका आराम खुर्चीत येवून बसलो होतो. कधी काळी याच घरांच्या मालकाने मला घरातुन शिव्या शाॅप देत माझ्या जातीचा उध्दार करत धक्का देऊन हकलून लावले होते.आणी ह्याच सरीता बाईने बघ्याची भुमिका घेवून मूग गिळून बसल्या होत्या आणी विजूशेठ माझ्या जातीचा भाजीपाला करुन मला अपमानीत करत होते. म्हणत होते की, या धेडाची माझी पायरी चडायची हिम्मतच कशी केली.माझ्या पोरीला फुस लावायची तुझी लायकी नाही तेव्हा आजूबाजूचे बरेश लोक जमा होऊन मला हीनवत होती. बिजूशेठचा तर तोंडाचा पट्टा सुरु होता मी खुपचं जलील केला गेलो होतो. काही लोकांनी तर माझ्यावर हात उचलला होता.पण मनू मध्ये पडली ती म्हणाली,होती तो माझा नवरा आहे म्हणून मी वाचलो होतो. आज तर मला वेगळाच अनुभव येत होता त्याच घराच्या मालकीन बाईने मोठ्या प्रेमाणे बोलावले होते.तेव्हा तर ह्याच सरीता बाई आपल्या नव-याची आज्ञाचे पालन करत होत्या.नव-याच्या अज्ञात होत्या काय करणार हिंदू धर्माच्या संस्कृतीने महीलाना ही शुद्राचे स्थान होते. त्यांना ब्र सुद्धा काढण्याचा अधिकार नव्हता. म्हणून त्या नव-याच्या विरुद्ध आवाज उठवू शकत नव्हते. पण आज घराच्या प्रमुख म्हणून त्यांनी माझे चांगले स्वागत केले होते. पण मला बसल्या बसल्या आठवत होतो.
घरातुन पाण्याचा पेला मनू घेऊन आली होती. माझ्या हातात पेला देत म्हणाली, पाणी घ्या, मी तिला बघताच दचकलो आणि ताळकनी उभा राहिलो. आणी आपोआप माझ्या मुखातुन शब्द फुटले मनू कसी आहेस.
मनू म्हणाली, मी कशी असणार,नव-याने टाकून दिलेल्या बाईची स्थिती तसीच मी असणार ना. तसी बरी आहे.
तिचा अशा विधानाने मला राग आला आणि मी म्हणालो, मनू काय बोलतेस तुला कळते का ? काय माझी चूक आहे का ?
मनू म्हणाली, मग माझी चूक आहे का ? हुं हुं
मी म्हणालो, नाही ग बाई, माझीच चूक आहे. तुझी अजीबात नाही.
दोघांच्यात वाद निर्माण होऊ नये, म्हणून सरीताबाईन मम मध्ये म्हणाल्या, उगाच तुम्ही काही बोलूच नका, दोघांना गप्प केले.
मनू म्हणाली, आई तु बोलावले याला, कशासाठी, जो माणूस माझा झाला नाही. तो तुमचा कसा होईल.
सरीताबाई म्हणाल्या, हो, मीच बोलावले त्याला तु जरा शांत राहा बघू.
प्रकाश दादा आणि वहिनी दोघे त्यांच्याकडे बघत त्यांचे बोलणे ऐकत होते. वहीणी समजल्या की,आईने भावजी ना बोलावले असेन प्रकाशाला हातची खूण करत विचारले प्रकाश दादाने मान हलवून होकार भरला.
मनू आपल्या आईला म्हणाली,आई या माणसासाठी मी आज ही झुरते आहे.तोच म्हणतोय आता की, मनू तु खुप उशीर केला ग.खुप उशीर झाला म्हणून सांगतोय काहीच का वाटत नाही.या माणसाला, मनूकडून राहेले गेले नाही.
मी म्हणालो, मनू तु खुप उशीर केला मीच म्हणालो तुला पण यामागे काहीतरी कारण असेल ना ? कारणा शिवाय काही घडते का ?
मनू म्हणाली, काय कारण होते. येवढे मोठे, माझ्या मनाचा, माझ्या भावनांचा काहीच का विचार केला नाहीस तु माझा तुझ्या मनाला शिवलाच नाही का ?
मी म्हणालो, आई तुम्हीच सांगा हिला, किती वर्षे ईच्यासाठी फिर फिरलो मी, कितेक वेळा जम्मूला जावून आलो बायको असून रडवा सारखा राहिलों. आज नाही उदया ईला समज येईल ईच्यात बदल घडेल आणि ही माझ्या माघे न सांगता चालत येईल,पण नाही बापावर गेली आहे..जिद्दी,हट्टी. वरुन मलाच विचारते काय कारण आहे.तूच म्हणाली होतीस ना, आता माझी वाट नकोस बघू तू लग्न करुन घे, तूच म्हणालीस ना, आता लग्न करुन घे, म्हणून मी लग्न करुन मोकडा झालो.
मनू म्हणाली, होय, मीच म्हणाले होते. तुझे हाल माझ्याकडून बघीतले जात नव्हते म्हणून. तुझी काळजी वाटत होती समजलास.
मी सरीताबाईना म्हणालो,आई तुम्हीच सांगा काय करणार मी जो माणूस एक तप ज्या व्यक्तीची बघतो तिचं व्यक्ती माझ्या काळजी पोटी मला लग्न करायला सांगते का ? का तिला माझ्यावर विश्वास नव्हता का ? का मी तिची काळजी घेवू शकत नव्हतो का ?
सरीताबाई म्हणाल्या, आरे थांबा तुम्ही, काय चावलवे आहे तुम्ही थांब मधे कुणीच बोलणार नाहीत.थोडे शांतीने घ्या आपल्याला काही मार्ग काढता येतो का ?
मी म्हणालो, आई आता काय मार्ग काढायचा आहे.काढायचे उरलेच कुठे !
मनू म्हणाली, बघ,बघ आई ! एकतेचे ना, काय म्हणतोय, त्याला आता काहीच मार्ग काढायचा नाही. मी आता त्याची कोनी नाही.
मी रागातच म्हणालो, मग काय करु ! तुला हात धरुन म्हणू, मनू चल माझ्या सोबत.
मनू म्हणाली, होय, भटू मला तेच हवं आहे.तु म्हण ना, मनू मला तुझ्या शिवाय राहीले जात नाही तु चल माझ्या सोबत मी तुझ्या सोबत एका पायावर येयायला तयार आहे. मनू चे डोळे अश्रुंनी भरुन आले होते.
मी म्हणालो, होय, तुला असे कितीतरी वेळा विनवणी केली पण तु तुझ्या बाबांच्या मागे लागून मला लाथाडत गेली. नाही नाही आता मी असे करु शकत नाही.
सरीताबाई म्हणाल्या, बरोबर आहे भटू तुझे.
मनू रागवत म्हणाली,आई काय म्हणतेस तू माझी बाजू घेण्याचे सोडून परक्याची साथ देतेस.तुला मुलीचे काहीच पडले नाही. म्हणे, तुझे बरोबर आहे.
प्रकाश दादा मध्येस्थी करत म्हणाले,बघा मी,काय म्हणतो. तुम्हाला असे भांडून काहीही फायदा होणार नाही काही मिळणार सुध्दा नाही.म्हणून शांततेत सर्व मार्ग निघतील.
मनू म्हणाली, दादा नाही त्यांना आता मी नकोच आहे. मीच मेली, त्यांच्यासाठी जीव जाळत राहीले इतके वर्षे.
सरीताबाई म्हणाल्या, हा विषय आपण येथेच थांबूया नंतर यांवर आपण बघू ,सुनबाई झाले का चला जेवण करुया सोबत.
सुनबाई म्हणाल्या, आई आताच लावते ताट, चला फ्रेस व्हा प्रकाश दादाकडे वहीणी इशारा करत म्हणाली, जरा भाऊजी ना टावेल द्या बघू.
मी सुटकेचा श्वास सोडला होता.खाली मान घालून विचारात डुंबून गेलो होतो. मनूने स्वत:हाताला धरुन मला जेवायला बसवलं माझ्या बाजूला ती ही बसली तीने आज सारीच लाज लज्जा बाजूला सारली होती. मला अजीबात सोडायला तयार नव्हती.ती रडत होती.आपल्या हाताने मला घास भरवत होती.तिच्या मनांच्या गाभाऱ्यातुन प्रेम ओसांडून वाहताना मला जाणवत होते तिच्या डोळ्यातुन ओसंडत असलेले अश्रु मला बघवत नव्हते. पण काय करणार.
जेवण करुन सर्वच हॉलमध्ये बसले वहीणी फक्तं भाडेकुडे आवर सावर करत होत्या,पण त्यांचे लक्ष घारीसारखे नंदेच्या संसाराच्या गोंधळात अडकले होते.काय मार्ग निघतोय,तो चांगला मार्ग निघावा म्हणून देवाला नवसत होत्या.
बरेच वेळ गप्पा गोष्टी करत नंतर मी सरीताबाईना म्हणालो, आई मी निघतो, म्हणतोय काय बोलायचे होते ते बोलून झाले आहे. आता हा विषय आपण येथेच थांबू या .
तेवढ्याच गडबडीत मनू म्हणाली, थांब ना,थोडे. थांबलास तर बरे होईल.
मी म्हणालो, नको मनू बराच वेळ झाले आहे. योगी वाट बघत असेल माझी. मला निघायला हवं.
मनू म्हणाली, ती तुझी बायको वाट बघत असेल. मी ही तुझीच बायको आहे तर माझ्यासाठी थोडा.
सरीताबाई म्हणाल्या, भटू ती म्हणतेय तर थोडा वेळ थांब जरा सावकाश आताच जेवण झाले थोडा आराम करुन घे.
मी सरीता बाईचे मन मोडू शकलो नाही. त्यांना मान हलवून होकार दिला ठिक आहे आई.
मनूचा चेहरा खूलला होता. तिने माझा हात हातात घेत तिच्या रुम मध्ये घेऊन आली. तिने जसे स्वप्न रंगवले होते.बघीतले होते.ते तिच्या वाट्याला ब-याच वर्षांनी आले होते.मनूने मला आपल्या रुम मध्ये आराम खुर्चीत बसविले ती अगदी जवळ खेटून उभी राहीली आणी मला आपल्या छातीशी कवटाळून माझ्या डोक्यावरून केसात हात फिरवत राहीली.
मी म्हणालो, मनू काय करते .
ती थोडी भाणावर आली पण एक टक माझ्याकडे बघत राहीली मला तिच्या डोळ्यात भरुन घेत.
मी परत तीला म्हणालो, आ ग मनू बघतच राहणार आहेस का ? अशा बघण्याने नजक्ष लागायची थट्टे.
मनू म्हणाली, लागू दे ! नजर मला माझे मन भरुन बघू दे ! माझ्या खांद्यावर हात ठेवत .
मी तीचा हात बाजूला भारत म्हणालो,मनू आता मला निघायला हवं.
मनू म्हणाली, आज नको, आज तु माझ्याकडे थांब तू आणि मी तुला जावू देणार नाही.तू माझ्या जवळच राहणार आहे रुमचा दार बंद करत.
मी म्हणालो, मनू काय करते दरवाजा कशाला बंद करते.
मनू आश्चर्याने म्हणाली, का काय झाले असे आश्चर्य व्यक्त करायला आपण एकाच रूम मध्ये राहिलो नाहीत का ? कोणाला याचे घेणेदेणे नाही. कोणाला काय वाटते याचे विचार करत बसणे मूर्खपणा आहे.
मी म्हणालो, मनू घरातली माणसं काय म्हणतील याचा थोडा देखील विचार करत नाही.
मनू म्हणाली,कोन काय म्हणतील आ रे आपण नवरा-बायको आहोत हे घरातल्या सदस्यांना माहीती आहे तू त्याची काळजी करु नकोस.
मी म्हणालो,मनू मला भिती आहे.आपण नवरा-बायको आहोत हे जरी खरे असले पण मी दुसऱ्या एक स्त्रीचा नवरा देखील आहे. हे विसरु नको, म्हणून भिती वाटते.
मनू म्हणाली, ओ नो भटू काय धरुन बसलाय जुन्या जमान्यातील गोष्टी. जरा आज तोकडा वाग
तसे आम्ही खुप गप्पा मारल्या तसेच जुन्या आठवणी रंगून गोलो होतो.मनू एक ही संधी सोडायला तयार नव्हती. कधी माझ्या गळ्यात हाताचा विळखा घालत तर कधी माझ्या अंगावर मांडीवर लोडत. कधी कुरवाळत तर कधी कुशीत शिरायची पण मी तर तिला पुन्हा पुन्हा बाजूला सारत राहीलो.सावज होतो तिचा सावजा सारखा शिका-याने टाकून ठेवलेल्या जाळ्यात चूकवणारा. मी तिच्या सावज होतो.
मनू म्हणाली, भटू हे काय मी तुझ्या कुशीत शिरतेय आणि तू मात्र मला बाजूला सारतोस.
मी म्हणालो, नाही ग मनू मी कुठे तुला बाजूला सारतो तुला तसे वाटते मला अवघडल्या गत होतंय
मनू म्हणाली, भटू तु आज घरी गेला नाहीतर चालणार नाही का मला आज तुझ्याच सोबत राह्याचे आहे.कोमल स्वरात म्हणाली.
माझ्या अंगाला दरारुन घाम आला माझ्या अंतःस्थ मनातच्य गाभाऱ्यात चलबिचल झाली मनूला बाजूला सारत मनू नको मला हे जमणार नाही.माझ्याकडून असे कृत्य घडणार नाही.
मनू म्हणाली, काय घडणार नाही ? मी तुझी बायको नाही. नाही मोठ्या आवाजात ओरडली.
मी म्हणालो, आ रे ! हे काय येवढ्या मोठ्याने थोडे हळू शांत हो बघू . होय तू माझीच बायको आहेस पण नको, मी आता दुसरे लग्न केले आहे.आणी आता कुणाचा विश्वासघात करायचा नाही. जमणार नाही छे छे जमणार नाही.
मनू म्हणाली, काय जमणार नाही ? मी नसायची तेव्हा संजना, सजनाचा वापर केलास ना तु ! मी काही म्हणाली तुला सांग ना ?
मनूचे हे शब्द माझृया कानावर पडताच माझे मन बिथरले मी खरोखर भयभित होऊन भ्रमिष्ट झालो की, काय थोडा वेळ जाणवू लागले काय बोलायचे ते मला कळत नव्हते.मी माझा चेहरा माझ्यात हाताने लपविला आणी तिला म्हणालो, होय, मनू ती वेळ वेगळी होती.


0 टिप्पण्या