आदिवासी दिन साजरा

 टिटवाळ्यात जागतिक आदिवासी दिन साजरा



कल्याण ( शंकर जाधव ) ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी सामाजिक फाऊंडेशनचे अध्यक्ष बुधाराम सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली वाजपेयी चौकात करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेंचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, त्या नंतर उपस्थित पाहुणे यांचा सत्कार आदिवासी फाऊंडेशन तर्फे करण्यात आला. 

यावेळी आदिवासी समाजाच्या क्रांतिकारकांचे फलक लावून त्यांनी देशासाठी इंग्रजांशी दोनहात केले हा मचकूर या फलकावर टाकण्यात आला, तर  आदिवाशी क्रांतिकारकांची माहिती इतिहासामध्ये नोंदवून ती पाठ्यपुस्तकांमध्ये येण्यासाठी राज्य शासनाला प्रसार माध्यमातून विनंती केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या