कविता 🌸 सकल्याचा खुळ 🌸

 🌸 सकल्याचा खुळ  🌸 



सकल्यान सतल्याक लावलेल्यान खुळ 

नेहमी खायची दोघाही कांदो नी गुळ


दुकानातना सतलो हाडी फरसाण

पापडीखाली बसान खायची लपान


सतल्याचा सकल्यार जिवापाड प्रेम

सकलापन करायचा तितक्याच सेम


सकला सतल्याविना रवायचा  नाय

कनेडीच्या बाजाराकव जोडीनं जाय


सकला इला पवारांच्या बावडी वर

की सतलो ही कळशी घेवन हजर


सकला म्हशी घेवन गेली माळावर

की सतलो बैल नेई , नि रवा मागावर


जय सकला थय असायचो सतलो

पण सकल्याक घेवन गेलो नाथलो


सतल्याच्या जिवाक लागलो हा घोर

आठवणी काढून आता झुरता हा पोर


 शीघ्रकवी : हरिसंतोष✍️ 

संतोष गोपाळ सावंत (8/8/2021 रात्रौ 12 )


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या