कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ५ लाख ७८ हजार लसीकरणाचा टप्पा पार




डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट लाईन वर्कर तसेच १८ वर्ष वयावरील नागरिकांचे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमार्फत ३ लाख ९८ हजार इतके लसीकरण झाले.महापालिकेने गेल्या महिन्यात सुरु केलेल्या  मोबाईल व्हॅनद्वारे झोपड्पट्टी व चाळ परिसरात केल्या जाणा-या लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळला.यात  आत्तापर्यंत ३८,४८२3 इतके लसीकरण झालेले आहे. त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयामार्फत केल्या जाणा-या लसीकरण प्रक्रीयेमध्ये एकुण १ लाख ४१ हजार ४९० इतके लसीकरण झाले आहे.शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणा-या लस साठयानुसार नियोजन करुन महापालिकेच्या आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने गेले ६ महिने लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे करीत असल्यामुळे आत्तापर्यंत  ५ लाख ७८ हजार  नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या