कर्जबाजारी नागरिकांना मनसेचे संरक्षण कवच ...बँकेच्या वसुलीधारकांना मनसे देणार चोप
डोंबिवली ( शंकर जाधव ) राज्य सरकारच्या टाळेबंदीने अनेकांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या.तर व्यवसायासाठी घेतलेले कर्ज कडे फेडावे या चिंतेने अनेकांची झोप उडाली आहे.यात हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकाला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न पडला असताना ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे ती बँक वसुलीसाठी गुंड पाठवत असते.मात्र आता कर्जबाजारी नागरिकांना मनसेचे संरक्षण कवच मिळाले आहे.त्यामुळे यापुढे बँकेच्या वसुलीधारकांना मनसे वेळप्रसंगी चोप मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने डोंबिवली पूर्व विभागातील स्वयंवर सभागृहात वाहतूक सेनेचा संवाद मेळाव्यात वाहतूक सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय नाईक यांनी कर्जाचे हप्ते न फेडल्यामुळे विविध बँकेचे वसुलीधारक त्यांच्या गाड्या जबरदस्तीने उचलून नेत आहेत जर असा प्रसंग डोंबिवलीतील कोणत्याही नागरिकावर आला तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने डोंबिवली पूर्व विभागातील स्वयंवर सभागृहात वाहतूक सेनेचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला.संवाद मेळाव्याला मिळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनासह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां सोबत संवाद साधला.याप्रसंगी वाहतूक सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय नाईक साहेब आणि प्रदेश सरचिटणीस आरिफभाई शेख हे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाईक म्हणाले र्डोंबिवली शहर किंवा परिसरातील नागरिकांनी कर्ज काढून गाड्या घेतल्या आहेत, परंतु कोरोना महामारीमध्ये नागरिकांनी आर्थिक संकटामुळे कर्जाचे हप्ते न फेडल्यामुळे विविध बँका भाडोत्री गुंडांमार्फत त्यांच्या गाड्या जबरदस्तीने उचलून नेत आहेत जर असा प्रसंग डोंबिवलीतील कोणत्याही नागरिकावर आला तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्य शाखेत संपर्क साधावा. त्यांना सहकार्य केले जाईल असे आवाहन केले. तर लवकरच डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या अंतर्गत रिक्षा युनियनची स्थापना केली जाईल असे देखील जाहीर केले.तसेच नागरिकांनी आपले वाहतूक सेनेचे सभासदत्व घेतल्यास त्यांना विविध प्रकारे होणारा फायदा व इतरही काही महत्त्वाच्या योजनांची माहिती उपस्थित पदाधिकाऱी आणि कार्यकर्त्यांना दिली.यामुळे संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होऊन फायदा आगामी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होईल असे सांगितले. संवाद मेळाव्यात डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, जिल्हा सचिव प्रकाश माने, महिला जिल्हाध्यक्षा दिपीका पेडणेकर,महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर कचवे, ठाकरे, प्रकाश वलेकर आदींसह पदाधिकारी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या