वाहतूक वाॅर्डन आणि रिक्षाचालकाने बुजवला रस्त्यातील खड्डा
डोंबिवली ( शंकर जाधव ) रस्त्याचे काम कसे दिखाव्याचे असते हे पावसाच्या दिवसात दिसते.तर रस्त्यात खड्डे पडल्यास बुजविण्यास पालिका प्रशासनाची दिरंगाई हे सर्वाना माहिती आहे.अश्या वेळी वाहनचालकांचा जीव धोक्यात असल्याचे पाहून डोंबिवलीतील एका वाहतूक वाॅर्डन आणि रिक्षाचालकाने पुढे येत रस्त्यातील खड्डा बुजवला.यांच्या या कामाचे कौतुक नागरिकांनी केले असले तरी एकही राजकीय पक्षातील नेतेमंडळीने त्याच्या कामाची दखल घेतली नाही.डोंबिवली पूर्वेकडील चार रस्त्यावर पडलेला खड्डा बुजविण्यास गेल्या १५ दिवसांपासून पालिका प्रशासनाला वेळ मिळत नव्हता.शहरातील मुख्य रस्ता असल्याने येथे वाहनांची वर्दळ असते.या रस्त्यावर कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता असल्याने पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.मात्र याठिकाणी वाहतुकी नियंत्रण करत असलेले सुनील साबळे आणि रिक्षाचालक संजय पाटील यांनी अखेर रस्त्यातील खड्डा बुजवण्याचे ठरविले.दोघांनी माती,खाडी आणि रॅबिट टाकून रस्त्यातील खड्डा बुजवला.त्यांचे हे समाजकार्य पाहून काही वाहनचालक आणि नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये हे दृश्य कैद केले.एवढेच नव्हे तर त्यांनी वाहतूक वाॅर्डन आणि रिक्षाचालकाचे कौतुक केले.या दोघांचे कौतुक डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी करणे आवश्यक आहे.


0 टिप्पण्या