जिल्हाधिकारी यांनी केले 'शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठानच्या' कामाचे कौतुक
चिपळूण : (गुरूनाथ तिरपणकर) रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मा. श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा साहेब यांनी सावर्डे येथील कोवीड सेंटरला भेट दिली. त्यावेळी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. शेखरजी निकम साहेब यांनी कोवीड कालावधीत शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठान या संस्नेथेने केलेल्या सामाजिक, विधायक उपक्रमांची माहिती दिली. सावर्डे कोवीड सेंटर येथील कोरोना रुग्णांना दिला जाणारा पुरक आहार गेले २ महीने प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरविला जात आहे. मा. जिल्हाधिकारी यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक करून गौरवोद्गार काढले.
शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश सावर्डेकर, सचिव अरविंद भंडारी यांनी जिल्हाधिकारी मिश्रा यांचा सत्कार केला. आमदार श्री शेखरजी निकम साहेब, प्रांताधिकारी श्री.प्रविण पवार, तहसिलदार श्री.जयराज सुर्यवंशी, आरोग्य अधिकारी ज्योती यादव, लायन्स क्लब सावर्डेचे पदाधिकारी,सदस्य, सावर्ड परिसरातील डाँक्टर्स उपस्थित यावेळी होते .


0 टिप्पण्या