एका तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण....

 कल्याणमधील कोळसेवाडीत दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण....




कल्याण कोळसेवाडी विभागात दोन तरुण आणि एक तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे.राहुल गडेकर आणि बंटी प्रधान असे मारहाण झालेल्या तरुणाची नावे आहेत. ते उल्हासनगर विभागात राहतात. मध्यरात्री त्यांची एक मैत्रीण रिक्षाने प्रवास करत असताना चालक तिची छेडछाड करु लागला. तिने फोनवरुन याची माहिती तिच्या मित्रांना दिली. यानंतर हे दोघे मित्र त्या ठिकाणी पोहोचले. मात्र या ठिकाणी आल्यावर रिक्षाचालक आणि गावातील लोकांनी या तरुणांना जोरदार मारहाण केली. अगदी पट्ट्याने त्यांना मारहाण करण्यात आली. एवढेच काय तर या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली. मात्र या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या