१५ हजार किलो कांदे १५ हजार कुटुंबाला वाटप! डब्बेवाल्यांच्या मुलांनी केला रेकॉर्ड!
मुंबई - दहिसर मागठाणे येथे अवघ्या ३० मिनिटात १५ हजार किलो कांदे १५ हजार कुटुंबियांना वाटण्याचा रेकॉर्ड क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्यने केला. बहुतांशी मुंबईच्या डब्बेवाल्यांची मुले असलेल्या क्षितिज ग्रुपच्या नव्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्य करणाऱ्या तब्बल सहा लाखांहून अधिक सभासद असलेल्या संस्थापक अध्यक्ष मंगेश पांगारे यांच्या क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्याने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. दहिसर मागाठणे विभागातील १५ हजार कुटुंबीयांना रविवारी अवघ्या ३० मिनिटात पंधरा हजार किलो कांद्याचे मोफत वाटप केले. याकरिता क्षितिजच्या वतीने दोनशे टीम तयार करण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे कोणत्याही प्रकारे गर्दी होऊ नये याकरिता या विभागात ८० ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते या स्टॉलवर शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाचे सर्व नियम पाळून कांदे वाटप करण्यात आले तर हवामान खात्याने जोरदार पावसाचे दिलेल्या संकेत पाहता काही टीमने घरोघरी जाऊन कांद्याचे वाटप केले . सकाळी साडे अकरा वाजता कांदे वाटपास सुरुवात करण्यात आली तर ठीक बारा वाजेपर्यंत तब्बल १५ हजार कुटुंबांना कांद्यांचे मोफत वाटप करण्यात आले. क्षितिजने केलेल्या या नव्या विक्रमाचे श्रेय मंगेश पांगारे यांनी आपल्या क्षितिज सैनिकांना दिले आहे.


0 टिप्पण्या