रीत नको नियम नको
लिखाण आपले वेगळे
रुचेल आपल्या मनाला
तेच लिहूया की सगळे
विचार उतरवू मनातले
घेऊन शब्दांची जोड
विसरू जरा घटकाभर
लयीत लिहिण्याची खोड
समोरच्या पर्यंत पोहचले
मनाला त्याच्या रुचले
होते की अशीही कविता
आहेत काही गोड दाखले
फुटपट्टी लावून नका जगू
मनाला ही बेफाम पळू दे
तसेच आहे हो कवितेचे
तिला ही जरा मुक्त घडू दे
चेतन

0 टिप्पण्या