बाजारपेठ पोलिसांची गोमांस विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई..

 बाजारपेठ पोलिसांची गोमांस विक्री करणाऱ्या इसमावर  कारवाई..



प्रतिनिधी: अवधुत सावंत


  कल्याण येथे गोमांस विक्री करणाऱ्या एका इसमाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळ एकूण ७० किलो गोवंशीय जातीचे मांस मिळून आले आहे.


  याबाबत हाती आलेले वृत्त असे आहे कि, सदर बाबत पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सदर इसमास अटक करून त्याच्यावर बाजारपेठ पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


  सदरची यशस्वी कामगिरी वपोनिरी यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे, सहा पोलीस निरीक्षक अरुण घोलप, पो.हवा ती.के पावशे, पो.हवा यू.व्ही सावंत, पोना सचिन साळवी, पोना बी.आर बागुल, पोना पी एम बाविस्कर, पोना जी.एन पोटे, पो.शी आर.एम सांगळे यांनी केली आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक अरुण घोलप करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या