खळबळजनक ! जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले दोघा मैत्रिणींचे मृतदेह..
प्रतिनिधी: अवधुत सावंत
मुरबाड तालुक्यातील पोटगावच्या जंगलात दोघा मैत्रिणींचे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शारदा अविनाश अंबिज (१८) आणि मनिषा निरगुडे (१९) असे मृत अवस्थेत आढळून आलेल्या दोघींचे नावे असून त्या कल्याण तालुक्यातील केळणी आदिवासीवाडीच्या रहिवाश्या होत्या. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात आकस्मीत मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
आदिवासी तरुणांमुळे प्रकार आला समोर..
कल्याण तालुक्यातील केळणी आदिवासी वाडीत शारदा आणि मनिषा या दोघी जिवलग मैत्रिणी राहत होत्या. गेल्या शुक्रवारी आम्ही रानात जातो असे घरच्यांना सांगून घराबाहेर पडल्या. मात्र त्या दोघीही घरी परत आल्याच नाहीत. सोमवारी परिसरातील काही आदिवासी तरुण जंगलातील भाज्या आणण्यासाठी गेले असता शारदा आणि मनिषा यांचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळून आला. हा प्रकार मुरबाड पोलिसांना समजताच ते घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत दोघीचेही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पाठण्यात आले आहे.
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर सत्य येणार समोर..
शवविच्छेदनानंतर दोघींचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केला. त्यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात गावातील समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात उलटसुलट चर्चा होत्या. मात्र मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की यातील एक मुलगी कायम आजारी होती. तर दुसरीला घरातील कामांचा त्रास व्हायचा, याच नैराश्यातून यांनी आत्महत्या केली असण्याचा कयास आहे.
0 टिप्पण्या