राजश्री शाहू महाराज सार्वजनिक वाचनालयात त्यांचीच जयंती मोठ्या उत्साहात साजरी..


प्रतिनिधी : प्रविण बेटकर
मोबा. ९५९४४०१९२२
डोंबिवली (ठाणे)
कल्याण येथे आज दि. २६/०६/२०२१ शनिवार रोजी राजश्री शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय कल्याण पश्चिम येथे राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय व सोशल एज्युकेशन मूव्हमेंट या संस्थेचे माध्यमाने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. शाहू महाराज्यांच्या प्रतिमेला हार व फुले अर्पण करून मेणबत्ती व अगरबत्ती लावून वातावरण प्रकाशमय आणि सुगंधित करण्यात आले असून या प्रसंगी प्रा.युवराज मेश्राम हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे आयु. रामभाऊ चव्हाण सर होते. वरिष्ठांनी राजश्री शाहू महाराजांच्या जीवनावर अभ्यास पूर्ण मार्गदर्शन करून उपस्थित लोकांना प्रोत्साहित केले. तसेच नागसेन बुक स्टॉल चे मालक सोमनाथ भोसले, वाचनालयाचे संचालक आयु. एस.एच. मेंढे साहेब, डेडके साहेब, कार्यकर्ते राज पंडित सर वाचक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणारे स्वतः ऍड.ए.आर. कांबळे साहेब हे राजश्री शाहू सार्वजनिक वाचनालयाचे संचालक आणि सोशल एज्युकेशन मूव्हमेंट चे संघटक असून उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून व तोंड गोड करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या