आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीसाठी हॅम रेडीयो प्रात्यक्षिक व सराव सुरु


देवळाली प्रवरा - 
संभाव्य आपत्ती व्यवस्थापनाच्या   मदतीसाठी नगर जिल्ह्यातील हॅम  ऑपरेटरांचा सराव प्रात्यक्षिके घेण्यात आली असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा केंद्रीय दूरसंचार विभागाचे अधिकृत हॅम रेडिओ ऑपरेटर आप्पासाहेब ढुस यांनी दिली. 
       कोल्हापूर सांगली सारखी उद्भवणारी संभाव्य पूर परिस्थिती तसेच कोरोना महामारी आपत्ती मध्ये शासनाच्या मदत कार्यात हॅम रेडिओ च्या माध्यमातून बिनतारी संपर्क यंत्रणेचे जाळे उभारून मदत कार्यात हातभार लावणेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी अॅम्याचुअर रेडीओ क्लबचे अध्यक्ष परशुराम कुटे,  आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे आदींनी हॅम रेडिओ च्या माध्यमातून बिनतारी संपर्क यंत्रणेद्वारे प्रात्यक्षिके 
सराव सुरू केला आहे.
      जेंव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येते व संपर्क यंत्रणात बिघाड होता अशावेळी थेट उपग्रहातील वायुलहरी व्दारे हॅम रेडिओच्या संपर्क यंत्रणा उपयोगी येऊ शकते नगर जिल्ह्यातील विविध ठिकानी प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत, यासाठी वहानाला बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे 
     त्याचाच एक भाग म्हणून राहुरी तालुक्यातील हॅम रेडिओ ऑपरेटर आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व पत्रकार शिवाजी घाडगे यांनी  सराव प्रात्यक्षिक मध्ये सहभाग नोदविला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या