विक्रोळी कनमवार नगर येथील जलतरण तलाव त्वरीत बांधण्याची राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांची मागणी.




 मुंबई  (प्रतिनिधी) विक्रोळी पूर्व ला असणा-या  कनमावर नगर या कामगार वसाहतीमधील कामगाराच्या मुलासाठी कामगार कल्याण भवनच्या  समोरील जागेवर ऑलिम्पिक आकाराचे जलतरण तलाव बांधण्यासाठी अनेक वर्षा पासून म्हाडाचा भूखंड कामगार कल्याण मंडळाच्या ताब्यात ठेवण्यात आला असून त्या जागेवर जलतरण तलाव बांधण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी.व लवकरात लवकर बांधकाम करण्यात यावे अशी मागणी राज्य  गुणवंत कामगार असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हाध्यक्ष व कामगार नेते पभाकर तुकाराम कांबळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


    यासंदर्भात अधिक माहिती अशी की,मुंबई पूर्व उपनगरातील एकमेव ठिकाण महणून विक्रोळीचा भाग ओळखला जातो,कामगार कल्याण भवन केंद्र असलेले ठिकाण तसेच कामगार वसाहतीचा  संपूर्ण भाग असलेले ठिकाण महणजे कननमवार नगरचा परिसर असून या ठिकाणी गेली अनेक वर्ष झाली जलतरण तलाव बांधण्यासाठी महाडाने आपला राखीव भूखंड कामगार कल्याण मंडळाला देण्यात आला होता. पंधरा ते वीस  वर्षांपूर्वी या जलतरण तलावाचे उदघाटन महापौर दता दळवी यांनी राज्यमंत्री राजपुरोहित तसेच सन 2014 मध्ये स्थानिक आमदार मंगेश सागळे यांनी हा विषय विधान सभेत उपस्थितीत करून शासनाला जागे केले होते.याची दखल घेवून माजी कामगार  राज्यमंत्री ना. राजेंद्र गावित , आमदार मंगेश सांगळे  व ज्येषठ साहितिक वामन होवाळ याच्या उपस्थितीतीमधये 31ऑगस्ट 2014 रोजी जलतरण तलाव बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी मोठ्या दिमाखात उदघाटन होऊन सहा वर्ष झाली. तरीसुद्धा अद्याप या जलतरण तलावाच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आलेली नाही,अनेक राजकीय पक्षांचे  मंडळी निवडणुका आल्यानंतर तलावाचा विषय घेऊन पुढे येत होते .एक प्रकल्प होण्यासाठी वीस वर्षे का लागतात ! असा प्रश्न  सर्वाना पडलेला असून   या जागेवर हिरवीगार झाडे उभी असून या झाडामधये सापाचे प्रमाण वाढल्यास आजूबाजूच्या लोकांना याचा अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्वरीत महाआघाडी सरकारने व स्थानिक प्रतिनिधीनी जाणिवपूर्वक लक्ष देऊन लवकरात लवकर या जलतरण तलावाचे काम केल्यास याचा फायदा विक्रोळीतील कननमवार नगर, टागोर नगर,विक्रोळी पार्कसाईट,सूर्यनगर, पवई,कांजूरमार्ग,नाहूर, भांडुप व घाटकोपर मधील रमाबाई आबेडकर नगर कामराजनगर   आदी  भागातील मुलांना होणार असल्याचे गुणवंत कामगार पभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या