पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरींग असोसिएशन तथा डोंबिवली औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांच्यातर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पावसाने देखील हजेरी लावली होती. या संघटनेच्या सभासदांनी येत्या दोन महिन्यात पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.या कार्यक्रमाला कामा संघटनेच्या पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी नंदकुमार भागवत, उदय वालावलकर, संजीव काटेकर, नारायण टेकाडे, कामाचे माजी अध्यक्ष मुरली अय्यर, सचिव राजू बैळूर, सुधाकर पाटील, कमल कपूर , संजय दिक्षीत, सी.एल कदम, चांगदेव कदम, राहूल कासलीवाल आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच डिसीईटीपी व बायोनेस्ट या विषयी माहिती देण्यात आली. बायोनेस्ट केंद्र हे पुढील आठवडय़ात कार्यान्वित होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. औद्योगिक सांडपाण्यात अंतभूर्त असलेले रासायनिक मूलद्रव्य कमी करण्यास मोठय़ा प्रमाणावर हातभार लागण्यास मदत होणार आहे.
0 टिप्पण्या