परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी कोविड लसीकरणाची विशेष सुविधा !



 कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण 

           वैदयकीय आरोग्य विभाग 

दि. 15/06/2021


                          

 दिनांक 16 /06 /2021 ते 18/06/2021 पर्यत परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी कोविड लसीकरणाची विशेष सुविधा ! 

कल्याण डोंबिवली कार्यक्षेत्रातील परदेशी जाणा-या नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या मात्रेचे सत्र दि. 16/06/21 पासून 18/06/21 पर्यंत आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (प) येथे आयोजित करण्यात येणार असून,  कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेवून 28 दिवस पूर्ण झाले आहेत परंतू 84 दिवसापेक्षा कमी कालावधी झाला आहे अशा परदेशी जाणा-या 18 व त्यांवरील वयोगटातील सर्व नागरिकांसाठी सदर लसीकरणाची सुविधा सकाळी 10 ते संध्याकाळी  5 वाजेपर्यंत उपलब्ध करण्यात येत आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी आचार्य अत्रे रंग मंदिर कल्याण (प.)येथे पासपोर्ट, व्हिसा, अँडमिशन लेटर, नेमणुकीचे पत्र, अँड्रेस  प्रूफ या आवश्यक कागदपत्रांच्या मूळ तसेच छायांकित प्रतींसह संपर्क साधावा, पात्र लाभार्थ्यांचे छायांकित प्रती पडताळणी अंती जमा करून घेतल्या जातील याची कृपया नोंद घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या